AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी येत नसल्याने टाटाच्या व्यवसाय प्रमुखांची प्रताप सरनाईकांसमोरच माफी, म्हणाले मला…

टाटाचे व्यवसाय प्रमुख राजेश कौर यांनी मराठी येत नसल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर माफी मागितली आहे, ते मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

मराठी येत नसल्याने टाटाच्या व्यवसाय प्रमुखांची प्रताप सरनाईकांसमोरच माफी, म्हणाले मला...
Rajesh KaurImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 10, 2026 | 3:08 PM
Share

टाटाचे व्यवसाय प्रमुख राजेश कौर यांनी मराठी येत नसल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर माफी मागितली. मुंबईमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. तर 15 ऑगस्टपर्यंत आमचे मराठीचे वर्ग सुरू आहेत, त्यामध्ये त्यांनी मराठी शिकावं असं यावेळी प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये आयोजित या कार्यक्रमात बोलण्यासाठी राजेश कौर उभे राहिले, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मराठी येत नसल्यामुळे माफी मागितली आहे. सर्वात आधी मी माफी मागतो, कारण मी मराठी बोलू शकत नाही, असं या कार्यक्रमात कौर यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

दरम्यान यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कौर साहेबांनी सांगितलं की, मी मुंबईमध्ये व्यवसाय करण्यासाठी आलो आहे, बिझनेस हेड आहे. मला मराठी येत नाही. परंतु मी त्यांना सांगितलं. 15 तारखेपर्यंत मराठीचे वर्ग सुरू आहेत. त्यांना जर मराठी शिकण्याची इच्छा असेल तर ते मराठी शिकू शकतात. खरं तर ते कायद्याच्या कक्षेत नाहीये, कारण मराठी विभाग माझ्याकडे नाहीये, तरी सुद्धा मराठी मंत्री म्हणून, मराठी भाषेवर प्रेम करणारा व्यक्ती म्हणून किंवा एका साहित्यिकाचा मुलगा म्हणून, त्यांनी जर मला त्याविषयावर त्यांची भूमिका कळवली तर मी निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल, असं यावेळी सरनाईक यांनी म्हटलं आहे.

रिक्षाचालकांना मराठी सक्ती 

दरम्यान येत्या 15 ऑगस्टपासून रिक्षाचलकांना मराठी बोलता येणं सक्तीचं आहे. यापूर्वीच सक्ती करण्यात आली होती, परंतु त्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. रिक्षा चालकांना मराठी बोलता यावी यासाठी खास मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. 15 ऑगस्टनंतर रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुट दिली जाणार नाही, तसेच मुदतवाढ देखील मिळणार नसल्याचं यापूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्टनंतर रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलणं बंधनकारक असणार आहे, अन्यथा कारवाई होण्याची शक्यता आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत