AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलन मिटवण्यासाठी अमित शाह करणार मोठी खेळी, भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिले संकेत

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत भाजप कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या. ही निवडणूक जोशमध्ये नाही होशमध्ये लढवावी लागणार आहे, असा सल्ला अमित शाह यांनी दिला.

मराठा आंदोलन मिटवण्यासाठी अमित शाह करणार मोठी खेळी, भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिले संकेत
अमित शाह
| Updated on: Sep 25, 2024 | 9:21 AM
Share

Amit Shah Maharashtra : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच कालपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी काल विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत भाजप कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या. ही निवडणूक जोशमध्ये नाही होशमध्ये लढवावी लागणार आहे, असा सल्ला अमित शाह यांनी दिला.

“महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी”

“मी इथे राजकीय बोलायला आलेलो नाही. मी फक्त कार्यकर्त्यांशी बोलायला आलो आहे. काही राज्यांच्या निवडणुका काश्मीरपासून कन्याकुमारी आसामपर्यंत प्रभाव टाकतात. महाराष्ट्राची निवडणूकही त्यातील एक आहे. महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी असते. कलम 370 फाडून फेकला, तीन तलाक काढलं यासह धाडसी निर्णय घेतले. देशात पाकिस्तानी आतंकवाद्यांना थांबवायला कुणी नव्हतं, मोदींनी पुलवामा स्ट्राईक केलं, आता पाकिस्तानची हिंमत नाही. आमची अर्थव्यवस्था देशाची पाचवी अर्थव्यवस्था केली”, असे अमित शाह म्हणाले.

“निवडणुका जोशमध्ये नाही होशमध्ये लढवा”

“आगामी निवडणुका या जोशमध्ये नाही तर होशमध्ये लढवाव्या लागणार आहेत. निवडणुका जिंकवण्याचे काम हे कार्यकर्ताच करतात. त्यासाठी लक्ष ठेवून काम करावं लागतं. तसेच रणनिती बनवावी लागते. तेव्हा विजय होतो. मराठवाड्यात 48 पैकी 30 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. यामुळे आजपासूनच निवडणुका चालू झाल्या आहेत, असं समजून कामाला लागा”, असा सल्ला अमित शाह यांनी दिला.

“एका बूथवर 10 टक्के मत वाढवा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घ्या. प्रत्येक मंडळाच्या एका कार्यकर्ता शक्ती केंद्र द्यायचं आहे. यानंतर मंडळ अध्यक्ष प्रमुख यांना बूथ अध्यक्षाने 10 टक्के मत वाढवण्यासाठी फॉलोअप घ्या. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सगळ्या बूथवर एक राऊंड मारायचा. भारत माता की जय म्हणत रॅली काढायची आहे. त्यानंतर ज्या मंदिरात पुजारी असतील, त्याच्या पाया पडायचं. श्रीफळ देऊन १०१ रुपया द्यायचा आहे आणि त्यांचा निवडणुकीसाठी आशीर्वाद घ्यायचा”, असेही अमित शाहांनी म्हटले.

“मत वाढवण्यासाठी प्रत्येक घरात जायचं”

“महाविकासाआघाडीतील पक्षांची चिंता करायची नाही. मत वाढवण्यासाठी प्रत्येक घरात जायचं. पदाधिकारी कार्यकर्त्यांचे भांडण मिटवा. आजपासून निवडणुका चालू झाल्या आहेत असं समजा. माझं एकवेळी तिकीट कापलं होतं. मी निराश झालो. मात्र आता देशात कुठेही निवडणुका असेल तिथे मी जातो. हा पक्ष मागणाऱ्याला काही देत नाही, मात्र न मागणाऱ्या देत असते”, असेही अमित शाहांनी म्हटले.

“प्रत्येक बूथवरील महाविकासाआघाडीच्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या, विजय तुमचाच होईल. हे सगळं केलं तर मराठवाड्यात ३० जागा नक्की येतील. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या. मराठा आंदोलनाची चिंता करु नका. ते सरकार आणि फडणवीस बघतील. आमच्या वेळी 3 आंदोलने सुरू होती तरीही आपण जिंकलो. निवडणूक जिंकायची सवय लावा. मी ३ निवडणुका वाघ्याच्या तोंडातून निवडणूक जिंकल्या आहेत”, असेही अमित शाह म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?