नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकांना मोठा फटका

नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकांना मोठा फटका

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अखेर आज नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.  अंदाजे अर्धातास पाऊस झाला. आज सकळापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मिरचीच्या पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

जितेंद्र बैसाणे

| Edited By: अजय देशपांडे

Jan 22, 2022 | 6:30 PM

नंदुरबार : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अखेर आज जिल्ह्यात जोरदार पावसाने (unseasonal rain) हजेरी लावली.  अंदाजे अर्धातास पाऊस झाला. आज सकळापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मिरचीच्या पिकाला (Chili crop) या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात मिरचीचे उत्पन्न होते. व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आपली मिरची सुकवण्यासाठी मोकळ्या मैदानात टाकली होती. मात्र अचानक पाऊस आल्याने मिरची भिजली तसेच मजुरांची देखील तारांबळ उडाली. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. गहू आणि ज्वारीचे पिक भुइसपाट झाले असून, ढगाळ हवामानामुळे हरभाऱ्यावर देखील अळीचा प्रादुर्भाव होण्याचा दाट शक्यता आहे. ऐन हातातोंडाळी आलेल्या हात हिरावल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

पिकांना फटका

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अखेर दुपारी अडीचच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहु, ज्वारी या सारखी पिके भुईसपाट झाली असून, इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. वाळण्यासाठी घालण्यात आलेली मिरची देखील भीजली आहे.

हवेत गारवा वाढला

नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आज कोसळलेल्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, गारठा वाढला आहे. किमान तापमानात देखील घट नोंदवण्यात आली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळी राजा संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानाचा पंचाना करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

Nagpur School : 26 जानेवारीपर्यंत नागपुरातील शाळा बंदच, पालकमंत्र्यांचे आदेश काय? वाचा सविस्तर

Aurangabad School | शाळांची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची, शहर आणि ग्रामीण भागाच्या प्रशासकांचा निर्णय काय?

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें