विमान हजार फूट उंचावर गेल्यावर अचानक महिला किंचाळायला लागल्या, इवल्याश्या प्राण्यामुळे… काय घडलं अमेरिकेहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये?
अतिशय धक्कादायक असा प्रकार पुढे आलाय, ज्यानंतर थेट विमान कंपनीला माफी मागण्याची वेळ आली. हा प्रकार अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानात घडलाय. काही काळ विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.

एक अतिशय धक्कादायक असा प्रकार पुढे आलाय, ज्यानंतर थेट विमान कंपनीला माफी मागण्याची वेळ आली. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर वाद वाढल्यानंतर चक्क एअर इंडियाने माफी मागितली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, काही काळ विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानात धक्कादायक प्रकार
एअर इंडियाने निवेदन जारी करून माफी मागितली. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकाता मार्गे मुंबईला जाणाऱ्या AI180 या विमानात दोन प्रवाशांना लहान झुरळे दिसल्याने त्यांना त्रास झाला. ही घटना लक्षात घेताच आमच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही प्रवाशांची जागा बदलली. त्याच केबिनमध्ये त्यांना इतर ठिकाणी बसण्याची सोय करण्यात आली. पुढे त्यांना आराम मिळाला.
विमान कंपनीने केले निवेदन जारी…
जेव्हा विमान डिझेल भरण्यासाठी कोलकाता येथे उतरले तेव्हा ग्राउंड टीमने विमान पूर्णपणे स्वच्छ केले आणि विमानात असलेली झुरळे काढून टाकण्यात आली. काही वेळातच पुढे हे विमान मुंबईच्या दिशेने निघाले. यासोबतच एअर इंडियाकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले की, नियमितपणे आम्ही फ्यूमिगेशन करतो. मात्र, असे असले तरीही कधी कीटक विमानात प्रवेश करतात.
त्या घटनेची सविस्तर चाैकशी केली जाणार
एअर इंडियाकडून या घटनेची चाैकशी केली जाणार आहे आणि हे झुरळे विमानात नेमकी कशी आली, याची माहिती घेण्यात येणार असल्याचे एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र, या घटनेनंतर काही काळ विमानात गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. मागील काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांबद्दल सातत्याने विविध आरोप हे प्रवाशांकडून केली जात आहेत.
काही काळ विमानात गोंधळाचे वातावरण
काही दिवसांपासून एअर इंडिया कंपनीचे विमान चर्चेत आहेत. अहमदाबाहून लंडनसाठी टेकऑफ केलेल्या विमानाचा मोठा अपघात झाला, ज्याची चाैकशी सध्या सुरू आहे. या घटनेमध्ये विमानात प्रवास करणारा फक्त एक प्रवासी जिवंत राहिला, बाकी सर्व प्रवाशांचा जीव गेला. टेकऑफनंतर हे विमान काही सेकंदात मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले होते.
