AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांच्या पुतळ्याच्या निर्मितीत भ्रष्टाचार, तेच पैसे नारायण राणेंसाठी निवडणुकीत वापरले; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Vaibhav Naik on Ravindra Chavan Narayan Rane : ठाकरे गटाच्या नेत्याने रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. सरकारवर गंभीर आरोप करण्यात आलेत. वाचा सविस्तर...

शिवरायांच्या पुतळ्याच्या निर्मितीत भ्रष्टाचार, तेच पैसे नारायण राणेंसाठी निवडणुकीत वापरले; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
वैभव नाईकांची आक्रमक प्रतिक्रियाImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 28, 2024 | 11:36 AM
Share

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये या पुतळ्याचं उद्घाटन झालं. त्यानंतर आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. यावरून विरोधक आक्रमक झालेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं वैभव नाईक म्हणालेत. लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्यासाठी महराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारातील पैसे वापरले, असा आरोप नाईकांनी केलाय.

वैभव नाईकांंकडून गंभीर आरोप

आज आम्ही आक्रोश मोर्चा काढतोय. शिवप्रेमींचा संताप आज सरकारला दिसेल. लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यासाठी याच भ्रष्टाचारातील पैसे वापरले. राणे यांच्यासाठी मताला एक हजार रुपये वाटल्यामुळेच आता राणेंकडून पालकमंत्र्यांची पाठ राखण होत आहे. देशातल्या कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देणारे नारायण राणे आणि नितेश राणे गप्प का होते?, असं सवाल त्यांनी केलाय.

पुतळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न होतोय. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याकडून दोघांनाही अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सिंधुदुर्ग मधल्या वकिलांना फोन येत आहेत. या प्रकरणात आम्ही राजकारण केलं नाही. उलट पुतळा बसवला. त्यावेळी भाजपचे झेंडे लावले होते. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की पुतळा पडला कसा? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असं वैभव नाईक म्हणाले.

मालवण बंदची हाक

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय. मालवणमधील बाजारपेठ आज उत्सर्तपणे बंद ठेवण्यात आली आहे. भरड नाका इथली दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बाजारपेठ बंद आहे. राजकीय पक्षांकडून नव्हे तर स्थानिकांनी हा बंद पाळला आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्याच्या बरोबर समोर असणाऱ्या घरातल्या व्यक्तींने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला त्या दिवशीची परिस्थिती सांगितली. ज्या दिवशी पुतळा कोसळला त्या दिवशी खूप जोरदार वारं होतं. पाऊस आणि वारा एकत्र झाल्याने वाऱ्याचा वेग अधिक वाढला. वाऱ्याचा वेग पुतळा पाडणे एवढा होता का हे माहीत नाही मात्र त्यादिवशी वाऱ्याचा वेग अधिक होता, असं राजकोट किल्ल्यासमोरील घरात राहणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.