AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे किती टक्के मराठा मतदार?; प्रकाश आंबेडकर यांनी आकडाच सांगितला

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही निवडणुकासाठी कसून तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीने पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत 10 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदारांचाही मोठा प्रभाव पडणार असून त्याच संदर्भात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचं वक्तव्य केलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे किती टक्के मराठा मतदार?; प्रकाश आंबेडकर यांनी आकडाच सांगितला
| Updated on: Apr 12, 2024 | 1:28 PM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही निवडणुकासाठी कसून तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीने पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत 10 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदारांचाही मोठा प्रभाव पडणार असून त्याच संदर्भात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांच्या संदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. 30 टक्के मतदार हा जरांगे पाटील म्हणतील, तसे मतदान करणार आहे असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या मागे किती टक्के मराठा उमेदवार आहे याचा आकडाच थेट सांगितला. चंद्रपूर येथील पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते.

मोदींना देश तोडायचा आहे

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने 2029 च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. देशाचा एकोपा जो आहे यातील सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे राजकीय पक्ष असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे असे न मांडता ती नरेंद्र मोदींची आहे अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

भाजप पक्ष संपला आहे

आरएसएसशी आमचे मतभेद कायम आहेत. पण मी मोहन भागवतांना विचारतो की, मागील अडीच वर्षांत आपण किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला किंवा त्यांना तुम्ही सांगितलं आहे की, आपण भेटलं पाहिजे, असा सवाल आंबेडकर यांनी मोहन भागवतांना विचारला. या अडीच वर्षांत नरेंद्र मोदी आणि त्यांचा जो कार्यकर्ता आहे, त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की, नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील, तर त्यांनी मोदींचा प्रचार का करावा. कारण, प्रचार करताना भाजपचा उमेदवार आहे असे सांगितले जात नाही, तर मोदींचा उमेदवार आहे असे सांगितले जाते. त्यामुळे भाजप संपला आहे अशी परिस्थिती असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.