कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.. राज ठाकरे यांचा दिल्लीतील बड्या नेत्यावर निशाणा? म्हणाले..
दिशा सालियान प्रकरणात वारंवार राज ठाकरे यांचे नाव येत आहे. त्यातच दिशाच्या वडिलांनी मोठे विधान केले. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

दिशा सालियान प्रकरणात CBI ने आता गुन्हा दाखल केलाय. दिशाच्या वडिलांनी जबाबात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय. दिशाच्या वडिलांनी या बड्या नेत्यांची नावे घेतलेली असली तरीही CBIच्या FIR कॉपीत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नावच नाही. दिशा सालियान प्रकरणात सातत्याने ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. दिशा सालियान प्रकरणात सीबीआयकडून तपास केला जात आहे. हेच नाही तर कोर्टानेही काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊनही सीबीआयने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळेच आता दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांकडून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. यासोबतच नितेश राणे यांच्याकडूनही आदित्य ठाकरेंचे नाव घेतले जात आहे.
आदित्य ठाकरेंचे नाव दिशा सालियान प्रकरणात येत असताना भाजपाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे पाय खोलात असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्याने एकच चर्चा सुरू झाली. राज ठाकरे यांचा नक्की कोणावर निशाण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच ! अशाप्रकारची पोस्ट राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केली. काहींचे म्हणणे आहे की, राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्या टिकेवर ही प्रतिक्रिया दिली आहे. काल नवी मुंबईतील भाषणात बोलताना अमित शाह यांनी म्हटले होते की, महाराष्ट्र बहुभाषिक राज्य आहे, त्यावरूनही राज ठाकरे यांनी निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे विविध तर्क काढली जात आहेत. त्यावरून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. याच भाषणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मराठी भाषा माझी आई आहे तर हिंदी भाषा माझी मावशी आहे.
