कुंडलीत मृत्यू योग, तू खालच्या जातीची…वसईच्या तरुणीची आत्महत्या, अंजली दमानियांनी विचारला पोलीस, शिंदे गटाच्या नेत्याला घेरलं!
वसई येथे एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. तू खालच्या जातीची आहेस, तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे, असे म्हणत तिच्या प्रियकराच्या वडिलाने लग्न करण्यास नकार दिला होता.

वसईमधील 19 वर्षीय तरुणी रेवती निळे हिच्या आत्महत्याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या तरुणीचे मांत्रिकाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. मात्र तुमच्या कुंडलीत मृत्यूयोग आहे. तू खालच्या जातीची आहेस असं सांगून रेवती या मांत्रिकाने मृत तरुणीचे त्याच्या मुलासोबत लग्न लावून देण्यास नकार दिला होता. आता याच प्रकरणात अंजली दमानिय यांनी पोलीस प्रशासन आणि शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्याप्रमुखांना जाब विचारला आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार 19 वर्षीय रेवती निळे हिने 28 एप्रिल 2025 रोजी आत्महत्ये केली होती. आणि अजय राणा या मांत्रिकाचा मुलगा आयुष राणा याच्याशी प्रेमसंबंध होते. हमात्र तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे. तू खालच्या जातीसची आहेस. त्यामुळे माझ्या मुलासोबत तुझे लग्न होऊ शकत नाही, असे मांत्रिक अजय राणा याने सांगितले होते. त्यानंतर नैराश्यात येऊन या तरुणीने आत्महत्या केली होती. तसा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मृत तरुमीच्या कुटंबालाच पोलीस देतायत त्रास
तसेच, राजकीय दबावापोटी पोलीस मयत तरुणीच्या कुटुंबाला न्याय देत नाहीयेत. उलट पोलीस आम्हालाच त्रास देत आहेत, असा आरोप मृत तरुणीच्या कुटंबीयांनी दिला आहे. रेवती निळे या तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली होती.
पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही?
याबाबत वसई पोलीस ठाण्यात मांत्रिक आणि त्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा वसई पोलिसांनी योग्य ती कारवाही केली नाही, असा आरोप आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी राजकीय दबाव आणला म्हणून पोलिसांनी मयत तरुणीच्या कुटुंबाला न्याय दिला नाही असा आरोप करण्यात आला आहे.
मांत्रिकाने अनधिकृतपणे मांडले आहे ठाण
तसेच मांत्रिक आजय राणा हा वसईच्या किल्ल्यातील मंदिरात अनधिकृतपणे ठाण मांडून तेथे जादूटोणा करतो. त्याचे पोलिसात चांगले संबंध असल्याने पोलीस कारवाई करत नाहीत, तसे फोटोही आहेत, असाही आरोप करण्यात येत आहे.
स्वत: अंजली दमानिया यांनी निलेश तेंडुलकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांसमोर दबाव आणला होता का याचा जाब ही विचारला आहे. त्यावर या प्रकरणात माझा काही संबंध नाही आणि मी या दोन्ही पार्टीना ओळखतसुद्धा नसल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले आहे.
मात्र या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी वसईत आले आहे. न्याय मिळेपर्यंत मी लढणार असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.
