AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी देव आहे म्हणत पुण्याच्या महिलेचे शोषण, नंतर तिच्या पतीला बोलवून… वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा आणखी एक कांड समोर

वसईतील भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यने स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार केले आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

मी देव आहे म्हणत पुण्याच्या महिलेचे शोषण, नंतर तिच्या पतीला बोलवून... वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा आणखी एक कांड समोर
Rishikesh Vaidya
| Updated on: Apr 01, 2026 | 11:08 AM
Share

सध्या राज्यात नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे खळबळ उडाली आहेत. त्यातच आता दुसरीकडे भक्ती आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबांचे पेव फुटले असून वसईतून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका महिलेला जाळ्यात ओढून स्वतःला साक्षात महादेवाचा अवतार सांगणाऱ्या ऋषिकेश वैद्य नावाच्या भोंदू बाबाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघड झाली होती. या घटनेनंतर आता ऋषिकेश वैद्य या भोंदूबाबाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. या भोंदू बाबाने पीडितेच्या पतीला आणि चिमुकल्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

आरोपी ऋषिकेश वैद्य हा काही काळापासून पीडित महिलेच्या संपर्कात होता. त्याने आपल्या बोलण्यातून आणि अघोरी विचारांतून आपण देवाचा अवतार असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा फायदा घेत त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, पीडिता यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना तिला विविध प्रकारे ब्लॅकमेल करून वारंवार भेटीसाठी बोलावण्यात आले. हा सर्व प्रकार पीडितेच्या पतीला समजला. त्यानंतर पीडितेच्या पतीने ऋषिकेश वैद्यला फोन करुन जाब विचारला.

पीडितेच्या पतीने या सततच्या फोन कॉलचा जाब विचारला तेव्हा आरोपीने त्यांना चर्चेसाठी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी वसईतील हयात बंगल्यात बोलावले. तिथे गेल्यावर कोणताही पश्चात्ताप व्यक्त करण्याऐवजी आरोपीने पीडितेच्या पतीलाच धमकावले. जर तू पोलिसात गेलास किंवा हा प्रकार कुणाला सांगितलास, तर तुला आणि तुझ्या मुलाला मी संपवून टाकीन, अशी धमकी त्याने दिली.

पोलिसांकडून सखोल तपास सुरु

यानंतरही पीडितेच्या पतीने या दहशतीला न घाबरता वसई पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत अदखलपात्र (NC) गुन्हा नोंदवला होता. मात्र तक्रारीतील तथ्य आणि धमकीचे स्वरूप पाहता आरोपी ऋषिकेश वैद्य याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने केलेला अपमान) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता पोलीस सखोल तपास करत आहेत. या भोंदू बाबाने अशाच प्रकारे इतरही महिलांची फसवणूक केली आहे का, याची चौकशी सुरू आहे.

Follow Us
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
मोठी बातमी! अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा हादरवणारा दावा; थेट....
विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Vinayak Raut | विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय..
Sanjay Raut on Eknath Shinde | शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय राऊतांचं मोठं भाकीत
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत सर्वात मोठा निर्णय, आता....
खडसेंचा गौप्यस्फोट! शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
Eknath Khadse | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट! अमित शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
सडलेलं अन्न, Unsafe Products?; स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश