Bullet Accident | सुपरफास्ट बुलेटवरील नियंत्रण सुटलं, थरारक अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू

विरार हद्दीत खाणीवडे ब्रिजवर भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेट चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला

Bullet Accident | सुपरफास्ट बुलेटवरील नियंत्रण सुटलं, थरारक अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू

विरार : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत बुलेटचा भीषण अपघात झाला. विरार हद्दीत खाणीवडे ब्रिजवर भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेट चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बुलेट स्लिप होऊन महामार्गावर पडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Vasai Virar Bullet Accident kills rider)

नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विरारमध्ये आज (गुरुवार 31 डिसेंबर) सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. MH 48 AS 85 हा अपघातग्रस्त बुलेटचा नंबर आहे.

राजेश बजरंगी सिंह असे मयत बाईकस्वाराचे नाव आहे. तो नालासोपारा भागातील रहिवासी होता. तर मूनशी माजी असे जखमी व्यक्तीचं नाव आहे. तो वसई कामन चिंचोटी सागपाडा भागात राहतो.

घटनेनंतर तात्काळ जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अँब्युलन्सने दोघांना बावखळ येथील हायवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमी तरुणावर उपचार सुरु आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्या बाईकस्वाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

कुत्र्याला वाचवताना पुण्यात अपघात

पुण्यातील डेक्कन परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात घडला होता. गाडी वेगाने जात असताना अचानक कुत्रे गाडीसमोर आले. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी गरवारे पुलावरुन भुयारी मार्गात कोसळली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

मनोज काळगुंदेची कार गरवारे पुलाजवळ आली होती. त्यावेळी अचानक त्यांच्या कारसमोर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मनोजचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट गरवारे पुलाचा कठडा तोडून भुयारी मार्गात कोसळली होती. कारमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

संबंधित बातम्या :

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, पुण्यात गरवारे पुलावरुन कार खाली कोसळली

वसईच्या समुद्रात बुडालेली स्विफ्ट अखेर जेसीबीच्या मदतीने बाहेर

4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू

(Vasai Virar Bullet Accident kills rider)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI