VIDEO | कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, पुण्यात गरवारे पुलावरुन कार खाली कोसळली

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी गरवारे पुलावरुन भुयारी मार्गात कोसळली

VIDEO | कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, पुण्यात गरवारे पुलावरुन कार खाली कोसळली
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 11:21 AM

पुणे : कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पुण्यात कारचा भीषण अपघात झाला. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी गरवारे पुलावरुन खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Pune Car falls off Garware bridge in Deccan Accident)

पुण्यातील डेक्कन परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. गाडी वेगाने जात असताना अचानक कुत्रे गाडीसमोर आले. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी गरवारे पुलावरुन भुयारी मार्गात कोसळली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

रविवारी मध्यरात्री 12 वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली. डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज काळगुंदे (वय 24, रा. पाषाण) आणि इतर तिघे जण जंगली महाराज रोडवरील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री परत घरी जाण्यासाठी निघाले.

मनोज काळगुंदेची कार गरवारे पुलाजवळ आली. त्यावेळी अचानक त्यांच्या कारसमोर कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मनोजचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट गरवारे पुलाचा कठडा तोडून भुयारी मार्गात कोसळली.

अपघाताचा आवाज ऐकून मध्यरात्रीच्या सुमारास परिसरातील रहिवासी घटनास्थळी धावत आले. त्यांनी कारमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

नवले ब्रिज भागातील अपघाताच्या आठवणी

पुण्यात नवले ब्रिज परिसरात एका भरधाव ट्रकने 7 ते 8 वाहनांना उडवल्याचा खळबळजनक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. यात 6 जण जखमी झाले होते. कात्रजकडून नवले ब्रिजकडे येत असताना 14 टायर माळ भागात शोभणी हॉटेलसमोर आल्यानंतर ट्रकचे नियंत्रण सुटले आणि त्याने वाहनांना धडक दिली होती. कार, रिक्षासारख्या आठ वाहनांना दिलेल्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली होती.

संबंधित बातम्या :

…तर मुंबई-पुणे महामार्गावर बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांचं लायसन्स रद्द

पुण्यात नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात; मालवाहतूक ट्रकनं 7 ते 8 वाहनांना उडवले

(Pune Car falls off Garware bridge in Deccan Accident)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.