AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणबाबत धक्कादायक माहिती, स्वतःच्या बापालाच… क्राइम रेकॉर्ड समोर

Vidyanand Bapat Santosh Chavan : विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाल्याची घटना घडली होती. संतोष चव्हाण याने बापट यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. चव्हाण याच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणबाबत धक्कादायक माहिती, स्वतःच्या बापालाच... क्राइम रेकॉर्ड समोर
santosh chavan criminal recordImage Credit source: Google
| Updated on: Sep 03, 2026 | 7:28 PM
Share

गणेशोत्सवात लाऊडस्पीकर आणि डीजेच्या वापराला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाल्याची घटना घडली होती. संतोष चव्हाण याने बापट यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला अखेर अटक केली आहे. आता मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे.

संतोष चव्हाणने वडिलांना केली होती मारहाण…

राऊतवाडी परिसरात राहणाऱ्या चव्हाणवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी मारामारी आणि कट रचण्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता असून, सराईत गुन्हेगार म्हणूनही त्याची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाण याने स्वतःच्या वडिलांनाही मारहाण केली होती. या घटनेनंतर त्याच्या वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्क तोडल्याची माहिती आहे.

दरम्यान, आज सकाळी विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हनुमान नगर परिसरात गेला होता. तेथे त्याने काही मित्रांची भेट घेतली. त्यानंतर त्याने आपला मोबाईल फोन बंद केला. त्यामुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा शोधण्यात अडचणी येत होत्या. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हलवत संतोष चव्हाण याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

विद्यानंद बापट यांना पोलिस संरक्षण

विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या संदर्भात पुणे महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विद्यानंद बापट यांना यापुढे पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा...
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा विसर्ग
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
पुण्यातील गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम वाद: मंडळांची भूमिका
पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह
विद्यानंद बापट: लाऊडस्पीकरवरील वाद, पुण्यातील ध्वनिप्रदूषणावर हल्लाबोल
विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल:
मराठा आरक्षण: १९९४ च्या निर्णयावरुन विखे पाटील-शरद पवार वाद
मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष
तुम्ही स्वतःला देव समजता का? हायकोर्टाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढे...
तुम्ही स्वतःला देव समजता का? हायकोर्टाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढे असं काही म्हणाले की...
मोठी बातमी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा थेट निर्णय! आता सर्वसामान्य...
सर्वात मोठी बातमी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा थेट निर्णय! आता सर्वसामान्यांना सात दिवसांआधीच...
मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघणार? सरकारी शिष्टमंडळ अंतरवलीत दाखल
मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघणार? सरकारी शिष्टमंडळ अंतरवलीत दाखल