AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत रात्री मोठा राडा, विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवला? वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट

मुंबईत रात्री मोठा राडा झाला आहे. मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

मुंबईत रात्री मोठा राडा, विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवला? वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 9:55 AM
Share

राज्यभरात विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पुण्यात एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. दुसरीकडे आदिवासी विद्यार्थी देखील विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन करणारे विद्यार्थ्यांनी मुंबईत येऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, आदिवासी विद्यार्थी मुंबईत येत होते. त्याचवेळी पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवल्याचा दावा करण्यात येत आहे. विजय वडेट्टीवर यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मुंबईच्या दिशेने आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना रात्रीच्या सुमारास  अडवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.  पोलिसांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले. त्यानंतर केस करू’ अशी धमकी दिल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. विद्यार्थ्यांची बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचाही आरोप आहे.  आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून अडवणूक केल्याने विद्यार्थ्यांनी एकच संताप व्यक्त केला.  आदिवासी विकास मंत्री आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. वसतिगृहातील सुविधा, भोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळत नसल्याचा विद्यार्थ्यांचा यापूर्वीही आरोप आहे. त्यानतंर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत येऊन आंदोलनाची घोषणा केली होती.

विजय वडेट्टीवर यांची पोस्ट जशीच्या तशी 

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी ‘एक्सवर पोस्ट करत म्हटल की, आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्या मांडण्यासाठी आझाद मैदानावर येत आहेत, आणि त्यांना रात्री ३ वाजता वाटेतच अडवले जाते, हे कुठल्या लोकशाहीत बसते? आरोप असे आहेत की विद्यार्थ्यांचे फोटो काढले गेले, त्यांना “केसेस करू” असे धमकावले गेले आणि त्यांची बस ताब्यात घेतली गेली. आंदोलन सुरू होण्याआधीच त्याला चिरडण्याचा प्रयत्न होत असेल, तर सरकार नेमके कशाला घाबरत आहे? आदिवासी विकास मंत्री आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा या विद्यार्थ्यांचा संवैधानिक अधिकार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पोलिसी बळ वापरणे म्हणजे त्यांचा आवाज दाबणे आहे. मुख्यमंत्री साहेब, विद्यार्थ्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐका आणि दडपशाही थांबवा’.

Follow Us
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश