शेतकऱ्यांप्रमाणे हिंसक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?; विनायक मेटेंचा संतप्त सवाल

शेतकऱ्यांप्रमाणे हिंसक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?; विनायक मेटेंचा संतप्त सवाल
विनायक मेटे,नेते, शिवसंग्राम

मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने त्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. (vinayak mete reaction on maratha reservation issues)

भीमराव गवळी

|

Feb 05, 2021 | 1:07 PM

मुंबई: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने त्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार तारीख पे तारीख खेळतंय. दिल्लीत शेतकरी आपल्या मागण्यांसाठी हिंसक झाले होते. तसेच हिंसक झाल्यावर सरकार मराठा समाजाचे ऐकणार आहे का? असा संतप्त सवाल विनायक मेटे यांनी केला आहे. (vinayak mete reaction on maratha reservation issues)

आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होती. ही सुनावणी आता 8 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरून विनायक मेटे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. आज परत एकदा तारीख मिळाली आहे. 8 मार्चपासून सुनावणी होणार असून 18 पर्यंत संपणार आहे. पण आपलं दुर्देव असं की आरक्षणाबाबत तयारी करायला सरकार अजून किती वेळ घेणार आहे? किमान आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी तरी सरकारने आग्रह धरायला हवा होता. पण दुर्देवाने सरकारकडून तोही धरला जात नाही. सरकारने सर्वांना सोबत घेऊन रणनीती आखली पाहिजे, असं मेटे म्हणाले.

कसं लढायचं हे आम्हाला कळतं

जोपर्यंत मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारने नोकर भरती स्थगित करावी. दिल्लीतील शेतकऱ्यांप्रमाणे हिंसक झाल्यावरच मराठा समाजाचं ऐकणार आहात का? असा सवाल करतानाच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय. कसं लढायचं हे आम्हाला चांगलंच कळतंय, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आंदोलनाची घोषणा

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारचे काम ढिसाळ असून बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती सध्या राज्याची आहे, असं सांगत सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात येत्या 7 फेब्रुवारीपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच 13 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा मेटे यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (vinayak mete reaction on maratha reservation issues)

अनागोंदी कारभार सुरू

आम्ही साष्टपिंपळगाव येथे राजेश टोपे यांच्या विरोधात आंदोलन केलं. चव्हाणांच्या जिल्ह्यात आंदोलन केलं. पण दोघांनाही भेटायला वेळ नाही. आझाद मैदानात तरुणांनी उपोषण केलं. पण त्यांना न्याय मिळाला नाही. सरकारमधील मंत्री घटनेची शपथ घेऊन बेकायदेशीर कामे करतात, मुख्यमंत्री उघड्या डोळ्याने पाहात आहेत. सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (vinayak mete reaction on maratha reservation issues)

संबंधित बातम्या:

सरकारविरोधात मराठा समाज आक्रमक, 7 फेब्रुवारी रोजी राज्यभर एल्गार; चव्हाणांच्या घरासमोरही आंदोलन

उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम, विधानसभा अध्यक्षपदाबद्दल तेच ठरवतील : उदय सामंत

LIVE | अर्णब गोस्वामी, कंगना रनौत देशप्रेमी आहेत, संजय राऊतांचं टीकास्त्र

(vinayak mete reaction on maratha reservation issues)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें