AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडची तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरू, जामीनावर आज निर्णय

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.कराड याला पोटदुखीचा त्रास होत असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे आज कराड याच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार असल्याने सुनावणीत काय होतं याकडेही लक्ष लागलं आहे.

वाल्मिक कराडची तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरू, जामीनावर आज निर्णय
वाल्मिक कराड
| Edited By: | Updated on: Jan 23, 2025 | 7:01 PM
Share

बीडच्या मस्साजोग येथील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्या पोटात दुखायला लागल्यामुळे त्याला काल रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रात्री एक वाजता आणण्यात आले . तेथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान याच वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

वाल्मिक कराड याची सोनोग्राफी करण्यात आली तसेच त्याची मधुमेहाची तपासणी झाली. त्याचं ब्लड प्रेशरही चेक करण्यात आलं. काल रात्री 11.45 च्या सुमारास त्याला बीड कारागृहातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडच्या मस्साजोग येथील खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्याला 14 तारखेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याचे वकील अशोक कवडे यांनी त्याच दिवशी कराडच्या जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सरकारी पक्ष आणि तपास अधिकाराचे उत्तर मागवले होते. आता याच प्रकरणी आज केज जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र त्याच्यावर मकोका लागल्याने त्याला जामीन मिळण्याची शक्यता कमीच आहे. मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस तरी आरोपीला जामीन मिळत नाही. त्यामुळे किमान पुढचे सहा महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागण्याची शक्यता दिसत आहे.

कृष्णा आंधळे फरार घोषित

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा मागच्या महिनाभरापासून सापडत नाहीय. त्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे.

सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड पुण्याला गेला ?

दरम्यान खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व ईतर आरोपी सीआयडीला शरण येण्या पूर्वी बीड वरून पुण्याला गेले होता का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेची पुष्टी देणारे तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. त्यांनी बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले.

याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे. तसेच याच आलेशन गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. पाषाण येथे सीआयडी च्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मीक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती. पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ mh23 bg 2231 जी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.