VIDEO | झोपायच्या तयारीत असताना कुटुंबाला नागोबाचं दर्शन, रात्र घराबाहेर काढण्याची वेळ

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ गावात ही घटना घडली. (Wardha Family Cobra inside home)

VIDEO | झोपायच्या तयारीत असताना कुटुंबाला नागोबाचं दर्शन, रात्र घराबाहेर काढण्याची वेळ
वर्ध्यात कुटुंबाच्या घरात नाग आढळला


वर्धा : जेवणानंतर झोपायच्या तयारीत असलेल्या वर्ध्यातील कुटुंबाला घरातच नागोबाने दर्शन दिले. त्यामुळे साहजिकच कुटुंबीयांची तारांबळ उडाली. घरात नागाने ठाण मांडल्यामुळे भेदरलेल्या कुटुंबाला रात्र घराबाहेर काढण्याची वेळ आली. अखेर सर्पमित्रांनी नागाची सुटका केल्यानंतर शेळके कुटुंबाचा जीव भांड्यात पडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Wardha Family Found Cobra inside home)

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ गावात ही घटना घडली. शेळके कुटुंबीयांचे भोजन आटोपले आणि ऐन झोपण्याच्या वेळी घरात नागोबाचे दर्शन झाले. शिवणफळ येथील मुरलीधर शेळके यांच्या घरात हा नाग शिरला होता. त्यामुळे सदस्यांची तारांबळ उडाली. घरात नागोबाच्या दहशतीने कुटुंबाला रात्र घराबाहेर रस्त्यावर काढावी लागली.

गावकऱ्यांनी या नागाला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सापाला हाकलण्यासाठी विविध उपाय करण्यात आले. शेवटी मोहंगाव येथील सर्पमित्रांशी संपर्क साधत त्यांना बोलावण्यात आले. शेवटी तब्बल आठ तासांनंतर सर्पमित्राच्या मदतीने या नागोबाच्या दहशतीतून कुटुंबीयांची मुक्तता झाली. सर्पमित्रांनी नागाला पकडून जंगलात सोडले. मात्र कुटुंबियांवर रात्र रस्त्यावर काढण्याची वेळ आली.

पाहा व्हिडीओ

सांगलीत धावत्या दुचाकीत नागोबा

काही दिवसांपूर्वी सांगलीच्या शिराळा येथील दिग्विजय शिंदे यांना दुचाकीत नाग दिसला होता. शेतातून बाईकने जाताना त्यांना आपल्या पायाजवळ नाग आढळला होता. त्यांनी तशीच गाडी सोडून बाजूला झेप घेतली. त्यानंतर त्यांनी गाडीच्या आजूबाजूला बघितले असता त्यांना नाग आढळला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपले सहकारी मित्र श्रीराम नांगरे पाटील, ऋषिकेश घोडे पाटील, बंधू राजेंद्र शिंदे यांना तात्काळ फोन करुन बोलवून घेतले. (Wardha Family Found Cobra inside home)

बाईकच्या पॅनलमध्ये लपलेला नाग

सुरुवातीला शेतात नागाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. यावेळी नाग चुकून गाडीत गेला काय? ही शंका मनात आली. त्यामुळे तपासून बघितले, तेव्हा नाग सीटच्या खाली असलेल्या पॅनलमध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने बसलेला आढळला होता. यावेळी खूप प्रयत्न केल्यानंतर गाडीमधून या तरुणांनी नागाला बाहेर काढले आणि सुखरुपपणे त्याच्या अधिवासात सोडून दिले होते.

संबंधित बातम्या :

VIDEO | सांगलीतील शिराळात चालत्या दुचाकीत नाग आढळला

(Wardha Family Found Cobra inside home)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI