Wardha Court | वर्ध्यात चवका अष्ट्याच्या खेळातील वाद, मी हरलो म्हणून तू हसतो काय; मारहाण करणाऱ्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

Wardha Court | वर्ध्यात चवका अष्ट्याच्या खेळातील वाद, मी हरलो म्हणून तू हसतो काय; मारहाण करणाऱ्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा
मारहाण करणाऱ्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा
Image Credit source: tv 9

चवका उष्ट्याचा खेळ सुरू होता. बिरजू महाडोळे हा तिथं तिथं जाऊन बसला. भोळा वसाके हा तिथं उपस्थित होता. मी हरलो म्हणून तू हसतो म्हणत भोलानं बिरजूशी वाद घातला. बिरजूस शिविगाळ करत मारहाण केली. शिवाय जीवानिशी मारण्याची धमकी दिली. प्रकरण पोलिसांत गेलं.

चेतन व्यास

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 26, 2022 | 2:16 PM

वर्धा : चवका अष्ट्यांचा खेळ सुरू असताना झालेल्या हार-जीतवरून वाद झाला. यातून एकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी भोला उर्फ शंभू रामराव वसाके (Shambhu Ramrao Vasake) (रा. सिंदी (मेघे) यास न्यायालयानं (Court) शिक्षा ठोठावली. वर्धा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी प्रांजली राणे यांनी कार्ट उठेपर्यंत शिक्षा व 700 रुपयांच्या दंड ठोठावला आहे. सिंदी (मेघे) येथील बिरजू महाडोळे (Birju Mahadole) हा तरुण 2 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास त्याच्या घराजवळील मंदिराशेजारी चवका अष्ट्याचा खेळ सुरू असल्याने जाऊन बसला. तेथे भोला वसाके हा हजर होता. मी हरलो म्हणून तू हसतो काय, असे म्हणत भोला याने बिरजूसोबत वाद घातला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने बिरजू याला शिवीगाळ करीत दांड्याने मारून जखमी केले. शिवाय जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली.

काय आहे प्रकरण

चवका उष्ट्याचा खेळ सुरू होता. बिरजू महाडोळे हा तिथं तिथं जाऊन बसला. भोळा वसाके हा तिथं उपस्थित होता. मी हरलो म्हणून तू हसतो म्हणत भोलानं बिरजूशी वाद घातला. बिरजूस शिविगाळ करत मारहाण केली. शिवाय जीवानिशी मारण्याची धमकी दिली. प्रकरण पोलिसांत गेलं. सात व्यक्तींशी साक्ष नोंदविण्यात आली. न्यायाधीशांनी भोला वसाके यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावली. शिवाय सातशे रुपये दंडही ठोठावला.

सात व्यक्तींची साक्ष

याप्रकरणी रामनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतली. पोलीस अंमलदार नरेंद्र पाराशर यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात एकूण सात व्यक्तींची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश प्रांजली राणे यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू ॲड. सिद्धार्थ उमरे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी प्रवीण यादव यांनी काम पाहिले.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें