Har Ghar Tricolor : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॅाईंटचे उद्घाटन, हर घर तिरंगा उपक्रमाची जनजागृती, उत्कृष्ट 3 सेल्फीला पुरस्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. सोबतच हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे

Har Ghar Tricolor : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॅाईंटचे उद्घाटन, हर घर तिरंगा उपक्रमाची जनजागृती, उत्कृष्ट 3 सेल्फीला पुरस्कार
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॅाईंटचे उद्घाटन
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 10:04 PM

वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेल्फी पॅाईंट तयार करण्यात आला आहे. या सेल्फी पॅाईंटचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार रणजित कांबळे (MLA Ranjit Kamble), आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (Collector Prerna Deshbhartar), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे (Archana More), उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, तहसीलदार रमेश कोळपे उपस्थित होते.

प्रत्येकाना घरासमोर तिरंगा लावावा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. सोबतच हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गतच उपविभागीय अधिकारी कार्यालय वर्धा व उपविभागातील वर्धा, देवळी व सेलू कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा सेल्फी पॅाईंट तयार करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी किंवा कोणतीही इच्छुक व्यक्ती येथे आपला सेल्फी काढू शकतात. उत्कृष्ट तीन सेल्फीस पुरस्कार देखील दिला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे. प्रत्येकाने हर घर तिरंगा मोहीम कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून मोठ्या प्रमाणात यात सहभागी व्हा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

अभियान आत्मसन्मानाचे, देशाप्रती बांधीलकीचे

हर घर तिरंगा हा आपल्या सर्वांचे अभियान आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या संघर्षाची जाणीव, जागृती करण्याचा हा विषय आहे. त्यामुळे कुठल्याही अव्यवस्थेचे छायाचित्र काढून, व्हिडिओ बनवून, समाज माध्यमांवर व्हायरल करण्याऐवजी तरुणांनी सर्वप्रथम ती अव्यवस्था दूर करावी. सौहार्दपूर्ण परिस्थिती राहील, अशी वागणूक ठेवावी. हे अभियान उन्मादाचे नसून आत्मसन्मानाचे, आत्मियतेचे व देशाप्रती बांधिलकीचे आहे, याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.