तामसवाडा पॅटर्नचा अवलंब करुन वाशिम जिल्ह्यातील एक उपेक्षित गाव झाले पाणीदार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून आणि पूर्ती सिंचन विकास संस्था मार्गदर्शनात तामसवाडा पॅटर्नचा अवलंब करुन वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या उपेक्षित गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला आहे.

तामसवाडा पॅटर्नचा अवलंब करुन वाशिम जिल्ह्यातील एक उपेक्षित गाव झाले पाणीदार
Washim Village

वाशिम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून आणि पूर्ती सिंचन विकास संस्था मार्गदर्शनात तामसवाडा पॅटर्नचा अवलंब करुन वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या उपेक्षित गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला आहे. “जलहक्क” कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी हे मागासलेले गाव दत्तक घेऊन त्या गावात “पाणी” या विषयाला केंद्रस्थानी ठेवून लोकसहभागातून हे गाव पाणीदार बनविले आहे (Washim Pangari Mahadev Village Water Issue Resolved By Purti Sinchan Vikas Sanstha Tamaswada Pattern).

वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात पांगरी (महादेव) या 800 लोकसंख्या असलेल्या लोकवस्तीची मागील 20 वर्षांपासून  “गाव” म्हणून शासन दप्तरी कुठेही नोंद नाही. ना ग्रामपंचायत ना गट ग्रामपंचायत यामुळे विकासापासून कायम दुर्लक्षित राहिले. अकोला-वाशिम या दोन जिल्ह्याचं विभाजन झाल्याने या गावाला ग्रामपंचायतचा दर्जा नसल्यामुळे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ येथील ग्रामस्थांना मिळत नाही असं पाहिलं राज्यातील पाहिलं गाव होय.

Washim Village

Washim Village

या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा असून एक कि.मी. अंतरावरुन एका खाजगी विहिरीतून पाणी आणावे लागते. गावात अति कॅल्शियमयुक्त पाणी असल्यामुळे सहा रुग्णाचे मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू पावले तर सात रुग्ण मूत्रपिंडाच्या आजाराने डायलिसिस वर आहेत. ही समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्याच्या दृष्टीकोणातून सचिन कुळकर्णी यांनी या भटक्या विमुक्त समुदाय असलेल्या वनग्राम पांगरी मध्ये कार्यरत होऊन पुढाकार घेतला.

“लोकवस्तीमध्ये स्वहक्काचे मुबलक पाणी असल्यास विकासाला गती प्राप्त होते”, हा सिद्धांत गावकऱ्यांना पटवून तामसवाडा पॅटर्ननुसार सूक्ष्म उपपाणलोट राबविण्याचा संकल्प केला. पहिली पायरी म्हणून लोकसहभागातून 100 बाय 100 बाय 3 मीटरचा भव्य गावतलाव पडीक जमिनीवर निर्माण केला आहे.

इतक्यावरच न थांबता गावातून वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणचे दीड किलोमीटरचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले असून शिल्लक तीन किलोमीटर नाल्याचे आणि अंदाजे 4 किलोमीटर छोट्या उपनाल्याचे काम साधना अभावी शिल्लक आहे. नुकत्याच अचानक काही मिनिटे झालेल्या अवकाळी पावसामुळे, खोलीकरण – रुंदीकरण झालेल्या नाल्यात तुडुंब पाणी भरल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यामुळे गाव परिसराची आणि शेत शिवाराची भूजल पातळी चांगल्या प्रमाणे वाढवून गाव हक्काच्या तलावात तुडुंब पाणी भरलेले राहणार आहे.  याचा परिणाम शेत शिवारातील पाणी पातळीवर होऊन शेती सिंचनाकरिता चांगली मदत  होणार आहे. गावाचा पाणी प्रश कायमस्वरुपी मिटणार असल्यामुळे  गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पांगरी महादेव या गावात ज्याप्रमाणे सूक्ष्म पाणलोटाचे काम सुरु आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र असे काम करुन वाशिम जिल्हा टँकरमुक्त करा. अशा सूचना केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दुर्गम आणि उपेक्षित पांगरी (महादेव) या लोकवस्तीमधील लोकसहभागाने निर्माण झालेल्या भव्य तलावाचे 27 मे रोजी पांगरीवासीयां सोबत झालेल्या आभासी सभेत लोकार्पण केलं असता जिल्हा पाणीदार बनविण्यासाठी पुढाकार घ्या अस आवाहन केलं होतं.

Washim Pangari Mahadev Village Water Issue Resolved By Purti Sinchan Vikas Sanstha Tamaswada Pattern

संबंधित बातम्या :

राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला मिळणारी बक्षीस रक्कम तब्बल…

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन, पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ