मंदिराचा वाद दोन पंथांमध्ये, मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त; सध्याची परिस्थिती काय?

जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूरची ओळख. इथं जैन धर्मियांचे 24 वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर आहे. या मंदिराचा वाद या दोन पंथामध्ये आहे.

मंदिराचा वाद दोन पंथांमध्ये, मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त; सध्याची परिस्थिती काय?
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 10:16 AM

वाशिम : शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ मंदिर खुले करण्यासाठी आणि मूर्ती लेप करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून २२ फेब्रुवारी रोजी अंतरिम आदेश दिले. मंदिर उघडण्यासाठी १० मार्च रोजी प्रशासनाने मंदिराच्या चाव्या श्वेतांवर पंथीयांना दिल्या. त्यानंतर काल मंदिरात भाविक दर्शनासाठी जात होते. श्वेतांबर पंथीयांचे सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत होते. दिगांबर पंथीयांच्या १०० ते २०० लोकांनी चिथावणी भाषा वापरून वाद केला. लोखंडी रॉडने मारहाण केली. यात सुरत येथील एक भाविक जखमी झाला. दिगांबर समाजाने इथं स्पॉन्सर ठेवले असल्याचं श्वेतांबर पंथी पारस गोलेच्छा यांनी सांगितलं.

काही काळ तणाव

जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूरची ओळख. इथं जैन धर्मियांचे 24 वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर आहे. या मंदिराचा वाद या दोन पंथामध्ये आहे. या वादावर न्यायालयात 42 वर्षांपासून प्रलंबित होता. गेल्या 10 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने सदर मंदिर उघडण्याचा अधिकार श्वेतांबर पंथीयांना दिला. मात्र काल यावरून मंदिरात दोन पंथीयांमध्ये वाद झाले. त्यामुळे शिरपूर जैन येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

हे सुद्धा वाचा

भाविक घेत आहेत दर्शन

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर इथं जैन धर्मियांचे 24 वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराचा वाद सुरू आहे. श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथामध्ये काल वाद झाला होता. त्यानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला होता . आज सकाळी ६ वाजतापासून शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरामध्ये भाविक शांततेत दर्शन घेत आहेत.

मांसाहारी बाऊंसर ठेवले

शांती आणि अहिंसेचे संदेश देणाऱ्या भगवान पार्श्वनाथ मंदिरात श्वेतांबार आणि दिगांबर पंथीयांमध्ये काल वाद झाला. श्वेतांबर पंथीयांनी या मंदिरात मांसाहार करणारे बाउन्सर ठेवले. यावरून हा वाद झाल्याचं दिगांबर पंथीयांचे संजू छाबडा यांनी सांगितलं.

जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान पार्श्वनाथांची ओळख आहे. मात्र मंदिर वादावरून जैन धर्मीयांच्या दोन पंथांमध्ये वाद होत आहेत. काल झालेल्या वादाची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या शिरपूर जैन येथे तणाव पूर्ण शांतता आहे. मंदिरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.