AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim Bus Accident : रस्त्यालगतचे लोखंडी कठडे तोडून बस थेट शेतात पटली! थोडक्यात अनर्थ टळला

Washim Bus Accident : पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या या बसमध्ये तेरा प्रवासी होते. सुदैवानं या अपघातातून हे सर्व प्रवासी बालंबाल बचावले. दरम्यान, अपघातात थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

Washim Bus Accident : रस्त्यालगतचे लोखंडी कठडे तोडून बस थेट शेतात पटली! थोडक्यात अनर्थ टळला
वाशिमध्ये खासगी बसचा भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 10:34 PM
Share

वाशिम : वाशिमच्या रिसोड तालुक्यात (Risod Taluka, Washim) एका खासगी बसचा भीषण अपघात (Washim Bus Accident) झाला. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस रस्त्यालगतचे लोखंडी कठडे तोडून थेट शेतात उलटली. यावरुन या बसचा वेग किती जबरदस्त होता, याची निव्वळ कल्पना करता येऊ शकते! रिसोड तालुक्यातल्या श्री क्षेत्र लोणी येथं बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस रिसोडवरुन पुणे इथं जात होती. बालाजी ट्रॅव्हल्सची (Balaji travels) ही बस होती. लोणी गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर या भरधाव बसचा भीषण अपघात झाला. दरम्यान, या बसमधून 13 प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांनाही जबर मार यावेळी लागला. लोखंडी कठडे तोडून ही बस थेट एका शेतात जाऊन उटलली. यास बसचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान, बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंरत आजूबाजूच्या लोकांनी बसजवळ धाव घेतली. यानंतर स्थानिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलंय.

13 प्रवासी बालंबाल बचावले!

पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या या बसमध्ये तेरा प्रवासी होते. सुदैवानं या अपघातातून हे सर्व प्रवासी बालंबाल बचावले. दरम्यान, अपघातात थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. या अपघातनंतर बस ज्या ठिकाणी पडली होती, त्या ठिकाणी अवघ्या 15 फूट अंतरावर 11 केव्ही पॉवर हाऊसला जाणारा विद्युत पोल होता. या पोलला गाडी थोडक्यात धडकण्यापासून बचावली. त्यामुळे बसमध्ये अडकलेले प्रवासी अगदी थोडक्यात बचावलेत.

या ट्रॅव्हल्समध्ये रिसोड येथून जवळपास 13 प्रवाशी बसले होते. यामध्ये रिसोड, गोहोगाव हाडे, रायगाव आणि इतर गावातील प्रवाशी होते.भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले तर एक प्रवाशाचा पाय लक्झरी खाली दबला होता.

आवरा वेगाला, सावरा जीवाला!

गाडीचा चालक हा रिसोड पासूनच खूप वेगाने आणि धोकादायक अशी गाडी चालवत होता असं गाडीतीलच एकानं सांगितलंय. यामध्ये लोणी गावाच्या आजूबाजूला असलेल्या गावकऱ्यांनानी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढलंय. 108वर कॉल करून रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आलं. भरधाव वेगाने अनधिकृत प्रवाशी वाहतूक करणाऱ्यावर परिवहन विभागाने तसेच पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून हा गोरखधंदा बंद करावा, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळला जाणारा खेळ थांबवावा, असा सूर अपघातानंतर प्रवाशांमध्ये पाहायला मिळतोय.

पाहा अपघाताचा व्हिडीओ:

संबंधित बातम्या :

उत्तर प्रदेशात प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकराची मुलीच्या वडिलांकडून हत्या, मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला

Ambernath Youth Death : अंबरनाथमध्ये ‘बटन’ गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

Nanded | तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास, तरुणाची आत्महत्या, नांदेड स्थानकावर धक्कादायक घटना

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.