उत्तर प्रदेशात प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकराची मुलीच्या वडिलांकडून हत्या, मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला

उत्तर प्रदेशात प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकराची मुलीच्या वडिलांकडून हत्या, मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: Tv9

मंगळवारी रात्री नसीम प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मुलीच्या वडिलांना याची कुणकुण लागली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी नसीमला रंगेहाथ पकडले. मुलीच्या वडिलांना राग अनावर झाला अन् त्यांनी रागाच्या भरात नसीमचा गळा आवळून त्याची हत्या केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 30, 2022 | 6:25 PM

उत्तर प्रदेश : प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणा (Youth)ची प्रेयसीच्या वडिलांनी हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात मंगळवारी रात्री घडली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह गोणीत बांधून घराच्या अंगणात बनवलेल्या शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये टाकला. नसीम (18) असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मयत तरुण प्रेयसीला भेटायला आला असता प्रेयसीच्या वडिलांनी रंगेहाथ पकडले आणि गळा दाबून त्याची हत्या केली. (Boyfriend murdered by girl’s father to meet girlfriend in Uttar Pradesh)

काय घडले नेमके ?

नसीमचे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा या प्रेमाला विरोध होता. मंगळवारी रात्री नसीम प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मुलीच्या वडिलांना याची कुणकुण लागली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी नसीमला रंगेहाथ पकडले. मुलीच्या वडिलांना राग अनावर झाला अन् त्यांनी रागाच्या भरात नसीमचा गळा आवळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह घराच्या अंगणात बांधलेल्या शौचालयाच्या सेप्टिक टँकमध्ये टाकला.

अशी उघडकीस आली घटना

मुलगा रात्रीपर्यंत घरी न आल्याने रात्री अकराच्या सुमारास नसीमचे वडिल अजमत अली यांनी धौराहारा कोतवाली येथे मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती दिली. तसेच मुलगा नसीम हा प्रेयसीच्या घरी गेल्याची माहितीही दिली. नसीमचे वडील अजमत यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या वडिलांची चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत ​​नसीमचा गळा आवळून खून करुन मृतदेह गोणीत बंद बांधून सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शौचालयाच्या सेप्टिक टँकमधील पाणी पंपिंग सेटमधून बाहेर काढले आणि नसीमचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचे वडील सर्वन यांना ताब्यात घेतले आहे. (Boyfriend murdered by girl’s father to meet girlfriend in Uttar Pradesh)

इतर बातम्या

कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले, रेल्वे पोलिसांची कारवाई

मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, आंबिवली स्थानकातील धक्कादायक प्रकार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें