AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Taxi: नव्या वर्षात मुंबईकरांना गिफ्ट, जानेवारी पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन!

मुंबईकरांसाठी बहुप्रतिक्षित असा जलप्रवास लवकरच सुरु होणार आहे. नव्या वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते नवी मुंबई या वॉटर टॅक्सी सुविधेचे लोकार्पण केले जाईल.

Mumbai Water Taxi: नव्या वर्षात मुंबईकरांना गिफ्ट, जानेवारी पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 10:31 AM
Share

मुंबईकरांसाठी नव्या वर्षात एक झक्कास गिफ्ट आहे. बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी सेवेचे (Water taxi Service) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार आहे. या टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास अत्यंत कमी वेळेत करता येईल. आतापर्यंत मुंबईहून नवी मुंबईपर्यंत केवळ रस्ते आणि रेल्वेमार्ग उपलब्ध होता, आता मुंबईकरांना जलमार्गे  प्रवासाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई ते नवी मुंबईपर्यंत रस्ते मार्गाने जाण्यासाठी टॅक्सीद्वारे सव्वा तास ते पावणे दोन तास असा वेळ लागतो. मात्र नव्या वॉटर टॅक्सीद्वारे हा वेळ 30 मिनिटांपेक्षा कमी लागेल. तसेच मुंबईच्या वाहतुकीवरील ताणही कमी होऊ शकेल.

टॅक्सीच्या फेऱ्या आणि भाडे कसे?

– या वॉटर टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबईतील दोन जेट्टीदरम्यान प्रवाशांना वाहतूक करता येईल. यात जेएनपीटी येथे एक स्टॉप असेल. – दुसरी सेवा मुंबई ते रायगड जिल्ह्यातील रेवस दरम्यान असेल. मात्र या सुविधांसाठीचे भाडे काहीसे महाग आहे. – जलमार्गाची ही सेवा खासगी ऑपरेटरकडे सोपवण्यात आली आहे. याचे भाडे प्रति प्रवासी, प्रति मिनिट, 45 रुपये एवढे सध्या ठरवण्यात आले आहे. म्हणजेच मुंबई ते नवी मुंबईचे भाडे 12,00 ते 15,00 रुपयांदरम्यान असेल. तर जेएनपीटीपर्यंतचे भाडे 750 रुपये असू शकते, अशी माहिती इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस एलएलपीचे सोहेल कझानी यांनी दिली. – ही सेवा वर्षातील 330 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल. पावसाळ्यात सेवा बंद राहील. – या सुविधेकरिता सध्या 50 आसनी, 40 आसनी, 32 आसनी आणि 14 आसनी अशी चार जहाजे आहेत. याद्वारे 25 नॉट्सच्या वेगाने प्रवास करू शकतो.

एक दिवस आधी बुकिंग करावे लागणार

प्रवाशांना इथपर्यंत येण्यासाठी चर्चगेट, सीएसटी, नरिमन पॉइंट, गेट वे ऑफ इंडिया, डीसीटी, डॉकयार्ड, बेलापूर, नेरुळ आणि जेएनपीटी अशा विविध ठिकाणी पूल कॅब असतील. या शेअर अ कॅब तत्त्वावर असतील. त्यासाठी प्रति व्यक्ती 20 ते 30 रुपये भाडे आकारले जाऊ शकते. तसेच watertaximumbai.com या वेबसाइटवर तिकिटाचे ऑनलाइन बुकिंग एक दिवस आधी करावे लागेल, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि सिडको यांनी एकत्रितपणे काम केले. मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबईतील फेरी वार्फ येथे डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल उभारले तर सिडकोने नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरूळ येथील टर्मिनलचे बांधकाम केले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.  जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले जाईल. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील केमिकल टर्मिनलचेही उद्घाटन करतील आणि बंदरातील दुसऱ्या केमिकल टर्मिनलचे भूमिपूजन करतील.

इतर बातम्या

श्रीमंतीला कराची झळाळी अबब गर्भश्रीमंत एलॉन मस्क भरणार इतक्या कोटी डॉलरचा कर ट्वीट् करत  स्वतः केली अफाट कर भरण्याची घोषणा

Children running away from home| मुंबईनंतर आता पुण्यात वाढतोय घरातून पळून येणाऱ्या मुलांचा ओढा ; पळून येण्याची धक्कादायक करणे आली समोर

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.