राज ठाकरे आमच्या सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू; महायुतीच्या बड्या नेत्याच्या विधानाने पुन्हा चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका घेतलेली नाही. मनसेने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. पहिल्या टप्प्याची निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होत आहे. पण मनसेचा कुठेही आवाज दिसत नाहीये. त्यामुळे मनसे निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा संभ्रम आहे. तसेच मनसे महायुतीत येणार की नाही याबाबतचा संभ्रम असतानाच शिंदे गटाच्या बड्या नेत्याने एक विधान केलंय.

राज ठाकरे आमच्या सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू; महायुतीच्या बड्या नेत्याच्या विधानाने पुन्हा चर्चा
राज ठाकरे आमच्या सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 12:56 PM

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पत्ते खोललेले नाहीत. राज ठाकरे महायुतीत येणार की नाही याबाबत मनसेकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतरही राज यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. राज ठाकरे यांचा येत्या 9 एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळावा आहे. त्यात ते भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापूर्वीच महायुतीच्या एका नेत्याने मनसे आणि महायुतीच्या युतीबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीतील एक प्रमुख नेते आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मनसेसोबतच्या युतीवर विधान करून चर्चांना तोंड फोडले आहे. राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. ते महायुतीत येणार की नाही याबाबत बोलण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. मात्र ते आले तर त्यांचे स्वागतच होईल. रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत केले जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांची सभा आहे आणि या सभेच्या दिवशी राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करू शकतात, असं संजय शिरसाट म्हणाले. शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते.

कुठलेही मतभेद नाहीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणची जागा श्रीकांत शिंदे हेच लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरही संजय शिरसाट यांनी विधान केलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवलीसाठी बरीच विकासाची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांचे या उमेदवारीच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे. कुठलेही मतभेद नाहीत. कुठलाही समन्वयाचा अभाव नाहीये. आम्ही सर्व मिळून श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं शिरसाट म्हणाले.

राजीनामा देण्याची गरज नाही

जे काही दुसरे रुसवे फुगवे असतील, जे काही गैरसमज असतील ते वरिष्ठ नेते एकत्र बसवून मिटवण्याचा प्रयत्न करतील, असंही त्यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने रामदास कदम यांना आता राजीनामा देण्याची गरज नाही. रामदास कदम हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तोफ धडाडणार

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ येत्या 9 एप्रिल रोजी धडाडणार आहे. शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. यावेळी ते महायुतीत जाण्याबाबत आणि निवडणुका लढवण्याबाबतची महत्त्वाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.