AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather : पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, गारांसह मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यामुळे पुढे काही दिवस पाऊस होणार आहे.

Maharashtra Weather : पुढचे तीन दिवस 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, गारांसह मुसळधार पावसाची शक्यता
| Edited By: | Updated on: Feb 18, 2021 | 11:38 AM
Share

पुणे : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात राज्यात पुण्यानंतर आता विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यामुळे पुढे काही दिवस पाऊस होणार आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिवाळ्यामुळे आधीच वातावरण थंड आहे त्यात पाऊस पडल्याने वातावरणात आणखी गारवा पसरला आहे. (weather alert On February 19 Central Maharashtra and Marathwada have been warned of heavy rains by Pune Meteorological department)

खरंतर, संपुर्ण राज्यावर पावसाचं सावट आहे. काल गोंदिया, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात गारपिटीची नोंद झाली. आज कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 19 फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

पुण्यातही पावसाचा इशारा

पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडं राहिल. यामुळे पुणेकरांनी आणि घाटमाथ्यावरील गावांनी काळजी घेत आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?

18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.

शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. (weather alert On February 19 Central Maharashtra and Marathwada have been warned of heavy rains by Pune Meteorological department)

संबंधित बातम्या –

Weather Alert | परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, काही ठिकाणी गाराही बरसल्या

Pune Weather : पुणेकरांसाठी हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update : राज्यात पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऐन थंडीत गारपीटीमुळे बळीराजा धास्तावला

(weather alert On February 19 Central Maharashtra and Marathwada have been warned of heavy rains by Pune Meteorological department)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…