AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?

महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली होती, परंतु आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे.

Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?
IMD weather forecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 19, 2026 | 8:17 PM
Share

राज्यात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस झाला. थोड्याच दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. परंतु त्यानंतर दहा ते बारा दिवस पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कसं राहील, या पुढील काळात किती पाऊस पडले आणि अल निनोचा प्रभाव कितपत पावसावर होईल?  या सर्व पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पावसाचं प्रमाण कसं असणार? 

चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार  गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला, हे जे 2026 वर्षे आहे ते  कमी पावसाचं वर्ष आहे. याचं महत्त्वाचे कारण क्लाइमेट चेंज हवामान बदल आहे, तसेच पावसावर अल निनोचा देखील प्रभाव आहे. हिंद महासागर आणि अरबी समुद्राचं देखील तापमान वाढलं आहे. परंतु असं असताना देखील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस पडला, याच कारण म्हणजे  आपल्याकडे बंगालची खाडी आणि अरबी समुद्र अगदी जवळ -जवळ असल्यामुळे  या भागात चांगला पाऊस पडतो, अनेकदा अल निनोचा प्रभाव असताना देखील चांगला पाऊस पडलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान जुलैमध्ये महाराष्ट्रातल्या पूर्व मध्य भागामध्ये जवळपास 200 ते 250 मिलिमीटर पाऊस पडला, मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात देखील चांगाला पाऊस झाला. यंदा  सतत पाऊस आपल्याकडे राहणार नाही, दर आठवड्यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन दिवस पाऊस राहणार आहे.  या महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याच कारण म्हणजे आपल्याकडे अरबी समुद्र आणि बंगालची खाली जवळ-जवळ आहे.  यंदा सरासरीपेक्षा काही प्रमाणात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...