AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert : कोकण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत थंडी कायम

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

Weather Alert : कोकण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत थंडी कायम
Weather Alert
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 9:10 AM
Share

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट (Cold Wave) पसरलेली आहे. राज्यात ठिकठिकाणी कमी तापमानाची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर आता 22 आणि 23 जानेवारीला कोकण (Kokan) आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. दुसरीकडे मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. मुंबईतील तापमान 19 अशांवर पोहोचलं होतं. तर, उपनगरांमध्ये तापमान 18 अंशावर पोहोचला असल्याचं दिसून आलं आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार राज्यात 22,23 जानेवारीला राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण मध्य-महाराष्ट्र भागात तुरळक ठिकाणी, हलक्या पावसाची शक्यताही वक्त करण्यात आली आहे.

आज मुंबईतील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून आलं आहे. 22 जानेवारीला रत्नागिरी, रायगड, पुणे, अहमदनगर, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, 23 जानेवारीला तळ कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा घसरला

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमी तापमानाची नोंद होत आहे. मुंबईत आज पहाटे तापमान 19अंश सेल्सियस नोंदवलं गेलं आहे. सकाळी 7 वाजता मुंबई शहर तसेच मुंबई ऊपनगरात तापमान 18 अंशावर होतं. येत्या दोन ते तीन दिवस मुंबईत असंच तापमान राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे.

के.एस. होसाळीकर यांचं ट्विट

नवी दिल्लीत पावसाची हजेरी

राजधानी नवी दिल्ली सह NCR मध्ये काल मध्यरात्री काही भागात पावसाने हजेरी लावली त्यामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर येत्या शुक्रवारी आणि शनिवारीही राजधानी सह परिसरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे हिमाचल प्रदेशमध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होत आहे त्याचा परिणाम उत्तर भारतातल्या थंडीवर दिसून येतोय

इतर बातम्या:

जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर, या शहरात डिझेल 77.13 रुपये तर पेट्रोल 82.96 रुपये; आपल्या शहराचे दरपत्रक जाणून घ्या

Mumbai Video | धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, टीसीने वाचवला प्रवाशाचा प्राण, थरार सीसीटीव्हीत कैद

Weather Forecast imd predicted unseasonal rain in Kokan and Madhya Maharashtra Mumbai also face cold wave

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.