जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर, या शहरात डिझेल 77.13 रुपये तर पेट्रोल 82.96 रुपये; आपल्या शहराचे दरपत्रक जाणून घ्या

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव वाढून ही आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर ७५ दिवसांपासून स्थिर राहिले आहेत. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा कमी आहेत. तुमच्या शहरातील भाव जाणून घ्यायचे आहेत तर एसएमएसवर माहिती घेऊ शकता

जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर, या शहरात डिझेल 77.13 रुपये तर पेट्रोल 82.96 रुपये; आपल्या शहराचे दरपत्रक जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलचे दर 
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 5:48 PM

Petrol-Diesel Prices Today: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केली नाही.  इंधन दरात कुठलाही  बदल केला नाही.  गेल्या ७५ दिवसांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. 4 नोव्हेंबर 2021 रोजीपासून वाहन इंधनाच्या किंमतीत बदल झालेला नाही.  केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी तर डिझेलवर प्रतिलिटर 10 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी केले, तेव्हापासून अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये लिटरच्या अवाक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. मात्र देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यांच्या दरावर काहीएक परिणाम झाला नाही. देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने त्याचा थेट परिणाम इंधन दरवाढीवर दिसून आला आहे. निवडणुकांनी दरवाढ रोखली आहे.

राष्ट्रीय राजधानीत आज पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67  रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. उत्पादन शुल्क कपातीपूर्वी वाहन इंधनाचे दर देशभरातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलने 100 रुपयांचा आकडा पार केला होता. दुसरीकडे अनेक शहरांमध्ये डिझेलने प्रतिलिटर 100 रुपयेही ओलांडले होते. याशिवाय उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पेट्रोल 95.28  रुपये आणि डिझेल 86.80  रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहे. आठ वर्षांपूर्वी असलेले सर्वाधिक दर सध्या प्रति बॅरल मोजावे लागत आहे. तरीपण भारतीयांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इंधन दरवाढीचा सामना करावा लागत नाही. देशात पाच राज्यात इलेक्शन लागल्याने त्याचा थेट परिणाम इंधन दरवाढ रोखण्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींनी २०१४ नंतर पहिल्यांदा प्रति बॅरल 87 डॉलर्स ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. असे असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 74 व्या दिवशीही कायम आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे मानक ब्रेंट क्रूड मंगळवारी 87.7 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. .

देशातील 4 महानगरांसह प्रमुख शहरांमध्ये आजचे भाव 

– दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर

– मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर

– चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

– कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

– गांधीनगर पेट्रोल 95.35 रुपये आणि डिझेल 89.33 रुपये प्रति लिटर

– लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लिटर

– पोर्ट ब्लेअर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर

किंमत दररोज संध्याकाळी 6 वाजता बदलतात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. या नव्या किंमती सकाळी 6 वाजेपासून  लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर वस्तू जोडल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होते.

तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घ्यायचे आहेत ?

आपण एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर  जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलच्या ग्राहकांना  RSP टाईप करुन  9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

सुरक्षित गुंतवणुकीचा ‘साथी’दार: सेबीचं डिजिटल पाऊल, नवं अ‍ॅप लवकरच मराठीत!

मार्केट ट्रॅकर : नव्या वर्षातला पहिला आयपीओ बाजारात, इश्यू प्राईस ते लिस्टिंग जाणून घ्या!

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...