AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : आधीचा पावसाचा अंदाज खरा ठरला, आता पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला; पाऊस कुठे पडणार? कुठे सूर्य दिसणार?

लातूर, बीड, परभणी, धाराशीव, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगरातही बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे. आणखी दोन दिवस मराठवाड्यात पाऊस असेल. मराठवाड्यात 8 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होईल.

Rain Update : आधीचा पावसाचा अंदाज खरा ठरला, आता पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला; पाऊस कुठे पडणार? कुठे सूर्य दिसणार?
rain update and weather updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 06, 2026 | 9:19 PM
Share

Weather Update : सध्या राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. धरणं भरायला लागली आहेत. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हा पाऊस आणखी किती दिवस असेल, असे विचारले जात आहे. याचे उत्तर हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी दिले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीपासून ते पालघरपर्यंत हा पाऊस असेल. 8 जुलैपर्यंत पासवाचा असाच पावसाचा जोर असेल. 9 तारखेनंतर मुंबईला सूर्यदर्शन घडेल. 9 तारखेनंतर पुणे, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस कमी होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. याआधी त्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता, त्यांचा हा अंदाज खरा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राज्यात बऱ्याच भागात अजूनही पाऊस झालेला नाही. त्या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारामती, बीड, दौंड, उत्तर सोलापूर, सांगलीमध्ये जोरदार पावसाचे आगमन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण भागात थोडा पाऊस कमी असेल. 7 जुलैनं तर दक्षिण सोलापुरातही पाऊस होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

मराठवाड्यात काय स्थिती?

त्यानंतर लातूर, बीड, परभणी, धाराशीव, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगरातही बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे. आणखी दोन दिवस मराठवाड्यात पाऊस असेल. मराठवाड्यात 8 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होईल. 9 तारखेला हवामान साधारण असेल. विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या भागात आणखी दोन दिवस म्हणजे 7 जुलैपर्यंत पाऊस असेल, असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.

विदर्भात काय स्थिती असेल?

अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली या भागातही 8 जुलैपर्यंत पाऊस असेल. दुपारनंतर पश्चिम विदर्भात पाऊस कमी असेल. नंदूरबार, धुळे, जळगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगरातील काही भागात सध्या पाऊस नाही. परंतु या भागातही 8 जुलैपर्यंत पाऊस असेल, असेही भाकित त्यांनी व्यक्त केले आहे.

तीन दिवस पावसाळी वातावरण

कोल्हापूरच्या पंचगंगेची पातळी वाढणार आहे. या भागात घाटमाथ्यावर पासवाचा जोर कायम असेल. पंचगंगेची पाणीपातळी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता कमी आहे. उजनी धरण वेगाने भरत आहे. त्यामुळे निळवंडे, भंडारदरा धरणही भरत आहे. एकूणात राज्यात आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण आहे. त्यानंतर सगळीकडे सूर्यदर्शन होईल. मुंबईतील जनतेने आणखी तीन दिवस स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ