AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : मॅन्युलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : "राज्य मंत्रिमंडळाने अजूनही काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कॅन्सर सेवा पॉलिसी तयार केली आहे. या कॅन्सर केअर पॉलिसी अंतर्गत राज्यात सगळ्या जिल्ह्यात कॅन्सर उपचार उपलब्ध असले पाहिजेत, अशी रचना केलेली आहे. जेणेकरुन कोणालाही कॅन्सरसारख्या आजाराची ट्रीटमेंट मिळण्याकरता महत्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : मॅन्युलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 30, 2025 | 2:35 PM
Share

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विशेषत: मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांच जे काही नुकसान झालं, त्याचा आढावा आम्ही घेतला. 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ऑगस्टपर्यंतच नुकसान होतं, त्यासाठी राज्य सरकारने 2215 कोटी रुपयाचं वितरण चालू केलं आहे. केवायसीची अट शिथिल केली आहे” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“आता पुढच्या दोन-तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे असेसमेंट घेता येत नव्हतं. काही ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे. घर, विहिरी गेल्या आहेत. शेतकऱ्यांच ज्या-ज्या प्रकारच नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात सर्वसमावेशक पॉलिसी तयार करुन पुढच्या आठवड्यात घोषणा करु. सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करु” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पुढच्या आठवड्यात घोषणा

“ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. ओला दुष्काळ आतापर्यंत कधी जाहीर झालेला नाही. ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या सवलती, उपायोजना केल्या जातात. तशाच प्रकारच्या सवलती दुष्काळी टंचाई पडली आहे, असं समजून यावेळी सुद्धा सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा अर्थ तोच असतो. नुकसानीची आकडेवारी जमा होत आहे. पुढच्या आठवड्यात मी, शिंदे साहेब, अजितदादा बसून निर्णय घेणार आहोत, घोषणा करणार आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....