AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : कंटेनरवर कंटेनर असलेली ट्रेन, वेस्टर्न डेडिकेटेड फ्राइट कॉरिडोरमुळे थेट किती फायदे, फडणवीसांनी समजावलं सगळं गणित

Devendra Fadnavis : वेस्टर्न डेडिकेटेड फ्राइट कॉरिडोरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कॉरिडोरचे फायदे समजावले. एक ट्रेन 250 ट्रकचा माल घेऊन जाऊ शकते इतकी क्षमता असणार आहे.

Devendra Fadnavis : कंटेनरवर कंटेनर असलेली ट्रेन, वेस्टर्न डेडिकेटेड फ्राइट कॉरिडोरमुळे थेट किती फायदे, फडणवीसांनी समजावलं सगळं गणित
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 08, 2026 | 3:14 PM
Share

वेस्टर्न डेडिकेटेड फ्राइट कॉरिडोरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. “अनेक राज्यातून हा कॉरिडोर जाणार आहे. 1 लाख 30 हजार कोटी खर्च करुन कॉरिडोरचं काम पूर्ण झालय. स्पीड वाढवणार आहे. जिथे आपल्याला तीन दिवस लागायचे. तिथे 12 तासात कार्गोची मूमेंट होईल. पहिल्यांदा देशात कंटेनरवर कंटेनर अशी पद्धतीची ट्रेन तयार करण्यात आलीय. 1 किलोमीटर लांब ट्रेन आहे. म्हणजे एक ट्रेन 250 ट्रकचा माल घेऊन जाऊ शकते” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “इतक्या प्रमाणात ट्रेनची क्षमता केली आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. डिझेल-पेट्रोल वाचणार आहे. गती वाढणार आहे. सगळ्यात महत्वाच उद्योग क्षेत्राच भारतासमोरचं सगळ्यात मोठं संकट असं होतं, सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्स मध्ये 14 टक्के कॉस्ट लागायची. चीन मध्ये हीच लॉजिस्टिक्स कॉस्ट 7 टक्के लागायची. मोदीजींनी मागच्या 10 वर्षात हीच कॉस्ट 14 टक्क्यावरुन 10 टक्क्यावर आणली आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे ही कॉस्ट 7 टक्क्यापर्यंत आणू शकतो. चीनशी थेट स्पर्धा करता येईल. याचा थेट फायदा जेएनपीटी बंदराला होईल. जेएनपीटी बंदर पुढच्या दोन वर्षात 10 लाख टीयूएन हाताळेल. इतकी क्षमता असलेलं हे देशातलं पहिलं बंदर असणार आहे. उद्योग, व्यापार आणि रोजगाराची एक मोठी भेट मोदीजींनी आपल्याला दिली आहे. जपान सरकार जायकाने मदत केलीय. मोदीजी, रेल्वे मंत्री महोदयांचे आभार मानतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रातील ही क्रांती आहे. हा कॉरिडोर 1600 किमी पर्यंतचा असणार आहे. उत्तर प्रदेशातून वेगवेगळ्या राज्यातून जेएनपीटी बंदरापर्यंत ट्रेन येईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘नमो फॉर विकसित भारत’

“आज मी विकसित भारताच्या यात्रेला गती देण्यासाठी आलो आहे. थोड्यावेळापूर्वी हजारो रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन झालं. मी देशातील जनतेचं अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी सेवाभावातून स्वच्छतेचे अभियान राबवलं. त्यांचे आभार मानतो” असं पीएम मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या वडोदरा येथे ‘नमो फॉर विकसित भारत’ कार्यक्रमाला आलेले.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...