AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाळासाहेब असतानाच ठाकरे बंधूंनी…’, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी काय म्हटले?

आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांनी यायला पाहिजे, अशी आमची पहिल्यापासूनच भावना आहे.

'बाळासाहेब असतानाच ठाकरे बंधूंनी...', माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी काय म्हटले?
राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 09, 2025 | 1:09 PM
Share

मनसे नेते राज ठाकरे असो की शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे हे दोघेही राजकारणातल्या बुडत्या नावेत बसलेले आहेत. त्यामुळे दोघेही कोणाच्या नावेत बसले तरी ती नाव बुडणारच आहे. दोघे एकत्र आले तरी त्यांचा राजकीय उद्धार होणारच नाही, अशी प्रतिक्रिया दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली. दोन ठाकरे बंधूंना एकत्र करण्यासाठी शिवसेनेत ज्येष्ठ नेते कोणी शिल्लक राहिले नाहीत. यामुळे त्यांना नातेवाईकांचा आधार घ्यावा लागत आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.

महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी एकत्र येणे हे ठाकरे बांधूनचे ढोंग आहे. दोघांना मराठी माणसांबद्दल काही देणे घेणे नाही. हे दोघे महानगरपालिकेसाठी एकत्र येत असल्याचा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला. ते म्हणाले, बाळासाहेब असताना ठाकरे बंधूंनी भांडण करायला नको होते. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांना झालेला आत्मक्लेष आता हे दोघे एकत्र येऊन काही भरून काढणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांना घरातल्या भांडणात खूप भोगावे लागले. आता तुम्ही दोघे एकत्र येऊन काही फरक पडणार नाही.

गजानन कीर्तिकरांना दिले उत्तर

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते गजानन कीर्तिकर यांनी राज, उद्धव यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना शहाजी बापू म्हणाले, गजानन कीर्तिकर यांचे वय झाले आहे. त्यांना काही गोष्टी लक्षात येत नाहीत. यामुळे ती अशी वक्तव्य करत आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे राम, लक्ष्मण, भरत यांच्याप्रमाणे जोड्या आहेत, असे त्यांनी म्हटले.

सुप्रियांनी मोदींच्या मंत्रिमंडळात यावे

महाराष्ट्राचा बाप हा महाराष्ट्राची जनता आहे, असे म्हणत सगळ्यांचा बाप म्हणून भाजपच्या मुख्यमंत्री बसलाय या नितेश राणेंच्या वक्तव्याला शहाजी बापू यांनी उत्तर दिले. पवार कुटुंबाबद्दल ते म्हणाले, शरद पवार यांचे ज्येष्ठत्व मान्य करून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच एकत्र यायला पाहिजे होते. मोदींच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांनी यायला पाहिजे, अशी आमची पहिल्यापासूनच भावना आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी