Barshi Video : आ. राजेंद्र राऊत यांनी कानशिलात मारलेला तरुणही माध्यमांसमोर, घटनेमागचे सत्य काय ?

Barshi Video : आ. राजेंद्र राऊत यांनी कानशिलात मारलेला तरुणही माध्यमांसमोर, घटनेमागचे सत्य काय ?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील भगवंत मैदानावर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, स्पर्धेचा शेवटचा दिवस असल्याने आ. राजेंद्र राऊत यांची देखील उपस्थिती होती. यावेळी आ. राऊत यांनी संपूर्ण मैदानाला राऊंड मारुन व्यासपीठावर हजेरी लावली. त्यावेळे कार्यकर्त्यांचाही गराठा त्यांना होता. याचवेळी मुन्ना विभूते हा देखील व्यासपीठावर गेला

सागर सुरवसे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 29, 2022 | 5:36 PM

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील (Barshi) बार्शी विधानसभा मतदार संघाचे (Rajendra Raut) आ. राजेंद्र राऊत यांनी एका तरुणाला कानशिलात मारल्याचा व्हिडोओ तुफान व्हायरल झाला होता. सदरील तरुण हा राऊत यांचाच कार्यकर्ता असूनही (On Stage) व्यासपीठावरील भेटीनंतर नेमके असे काय झाले की आ. राजेंद्र राऊत यांनी भर कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्याच्या कानशिलात लावली होती. मात्र, या घटनेनंतर अवघ्या काही वेळातच सदरील तरुणाचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये तरुणाने घटना वृतांत सांगितला असून आ. राऊत यांनी हे का केले याचे कारणही तरुणानेच सांगितले आहे.

नेमकी घटना काय ?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील भगवंत मैदानावर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, स्पर्धेचा शेवटचा दिवस असल्याने आ. राजेंद्र राऊत यांची देखील उपस्थिती होती. यावेळी आ. राऊत यांनी संपूर्ण मैदानाला राऊंड मारुन व्यासपीठावर हजेरी लावली. त्यावेळे कार्यकर्त्यांचाही गराठा त्यांना होता. याचवेळी मुन्ना विभुते हा देखील व्यासपीठावर गेला. कार्यकर्ता असल्याने त्याने आ. राऊत यांचे दर्शन घेतले आणि तेवढ्यात आ. राऊत हे त्याच्याशी बोलून अवघ्या काही वेळात त्याला कानशिलात लावली तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर तो कार्यकर्ताच आता माध्यमासमोर आला आहे.

काय म्हणाला तरुण?

आ. राजेंद्र राऊत यांनी तरुणाला कानशिलात लगावताच अवघ्या काही काळानंतर तो व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झला आहे. त्यापाठोपाठ आता कानशिलात लावलेल्या तरुणाचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये तरुणाने नेमके काय झाले हे सांगितले आहे. तर मुन्ना विभुते हा राऊत गटाचाच कार्यकर्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून तो राऊत यांच्या ख़डीक्रशरवर कामाला देखील आहे. क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान, तो आ. राऊत यांच्याजवळ तो दारु पिऊन गेला होता. दरम्यान, राऊत यांना नमस्कार करीत असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आली आणि त्यांनी मुन्नाच्या कानशिलात लावली. त्यांनी चांगल्या हेतूनेच हे केले असून यामुळे माझ्याच वर्तनात सुधारणा होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

ही तर विरोधकांची खेळी

आ. राजेंद्र राऊत यांचा यामागे उद्देश चांगला होता. पण विरोधकांनी कानशिलात लावल्याचा व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये काही तथ्य नसून माझ्या मनात याबद्दल काहीच नसल्याचे मुन्ना विभूते याने व्हिडीओमध्ये सांगितले आहे. मात्र, एकापाठोपाठ एक अशा प्रकारे व्हिडीओ व्हायरल झाल्याने बार्शीचे राजकारण ढवळून निघाले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें