AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?; पवार म्हणाले, हा चमत्कार…

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणूका लवकरच जाहीर होणार आहेत, येत्या 1 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेतील पहिला हप्ता राज्यभरातील बहीणीच्या खात्यावर जमा होणार आहे...यावर शरद पवार यानी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली....

लाडकी बहीण योजनेबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?; पवार म्हणाले, हा चमत्कार...
sharad pawar
| Updated on: Jul 17, 2024 | 2:03 PM
Share

मध्य प्रदेशातील लाडली बहेनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाली आहे. ही योजना आगामी विधान परिषदेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सुरु केली आहे.यावर देखील शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही चांगली योजना आहे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना आल्या. बहीण भावाचा विचार होतोय ही चांगली गोष्ट याचा आनंद होतो आहे लोकसभेत मतदारांनी जे मतदान केलेय त्याचा हा चमत्कार आहे, म्हणून मतदारांनी मते व्यवस्थित दिली तर बहीण आणि भाऊ सर्वांना आठवतील असे मिश्किल टीपण्णी शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना बजेटमध्ये आल्या आहेत. मागे अनेक वेळा बजेट मांडले गेले होते. त्यावेळी त्यांना लाडकी बहीण आणि भाऊ दिसले नाही.चांगली गोष्ट आहे.बहीण भावांचा विचार होतोय याचा आनंद आहे. लोकसभेत मतदारांनी जे मतदान केलंय त्याचा हा चमत्कार आहे. म्हणून मतदारांनी मते व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सर्वांची आठवण होतोय असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे. परंतू एक काळजीची देखील गोष्ट आहे, आपल्या राज्याचा क्रमांक आता सातवर गेला आहे.राज्याची स्थिती काय आहे.एककाळ असा होता राज्य पहिल्या दोन तीन क्रमांकावर असायचे, नियोजन आयोगाने यादी जाहीर केली. त्यात आपण ११ व्या नंबरवर आहोत. ही चिंतेची गोष्ट असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

राज्याचं भविष्य…

महाराष्ट्रावर 8 लक्ष 80 हजार कोटीचं कर्ज आहे. यावर्षीचं कर्ज वेगळं आहे. 20 हजार कोटीची महसूली तूट आहे. बजेट जनरली फेब्रुवारीत मांडतो. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पुरवणी मागण्या मांडतो. यावेळी बजेट मांडलं गेले. पुरवणी मागण्या मांडल्या. त्याची रक्कम 94 हजार 800 आहे. त्यात 40 कोटी बहिणींसाठी आहे. प्रचंड रकमा मांडल्या आहेत. याचा अर्थ एकच आहे लोकसभेचा निर्णय लक्षात घेऊन हे पाऊलं टाकलं गेलं आहे. आर्थिकदृष्ट्या आपलं राज्य मजबूत राज्य होतं. आता ते राहिलं नाही. दरडोई उत्पन्न घटलं आहे. राज्यप्रमुख मग कोणीही असो हे राज्याच्या भविष्यासाठी चांगले नसल्याचे  शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.