Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु, काय बंद? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

वीकेंड लॉकडाऊन दरम्यान नेमकं काय सुरु आणि काय बंद असेल याबाबत अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत (What will be open and close during weekend lockdown in Maharashtra).

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु, काय बंद? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 9:45 PM

मुंबई : कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवार-रविवारी लॉकडाऊन लागू असेल. मात्र, या काळात अत्यावश्यक सेवांना मुभा असेल. वीकेंड लॉकडाऊन दरम्यान नेमकं काय सुरु आणि काय बंद असेल याबाबत अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. सर्वसामान्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करण्यालसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे (What will be open and close during weekend lockdown in Maharashtra).

1) डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ? 

उत्तर : राज्य सरकारने 4 आणि 5 एप्रिल रोजी निर्बंधांबाबत आदेश जारी केले आहेत. जी दुकाने, मॉल्स आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील.

2) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (वीकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद ?

उत्तर : ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

3) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (वीकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय ?

उत्तर : कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे

4) बांधकाम दुकाने उघडी राहतील का ?

उत्तर : बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील

5) वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ?

उत्तर : वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

6) केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?

उत्तर : नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.

7) नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ?

उत्तर : हो. नागरिक हे 4 एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होमडिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.

8) मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का ? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ?

उत्तर : नाही.

9) रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ?

उत्तर : हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.

10) इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?

उत्तर : नाही.

11) दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ?

उत्तर : नाही.

12) आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील?

उत्तर : हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.

13) आठवड्याच्या शेवटी रात्री 8 नंतर किंवा सकाळी 7 च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ?

आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल (What will be open and close during weekend lockdown in Maharashtra).

संबंधित बातम्या :

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; वाचा, संपूर्ण नियमावली, काय सुरु, काय बंद 

राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Weekend Lockdown | सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.