AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा अन् शिंदे राजकारणात नसते तर काय बनले असते? मुख्यमंत्री फडणवीसांचं भन्नाट उत्तर

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

अजितदादा अन् शिंदे राजकारणात नसते तर काय बनले असते? मुख्यमंत्री फडणवीसांचं भन्नाट उत्तर
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 12, 2026 | 8:09 PM
Share

करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनच्या जोतिबाला नमन करतो, मी दोन वेळा नगरसेवक होतो, नागपूरचा महापौर देखील होतो. ज्याने पाप केलं तो नगरसेवक आणि महापाप केलं तो महापौर असतो. कारण शहरात कुठं काहीही झालं की पहिला नगरसेवक आणि नंतर महापौर यांना विचारलं जातं. जे सेवक म्हणून पाहिलं तर योग्य ठरतं, माझ्या शिवाय वार्डातून सुई देखील हलवता येणार नाही ही जी काही नगरसेवकांची मानसिकता असते ती  चुकीची आहे.  शहराचं नियोजन आधी फारसं होत नव्हतं, परंतु ग्रामीण भागातून नागरिक शहरात येत राहिले. संख्या वाढत राहिल्याने अव्यवस्था निर्माण झाली. सर्वात आधी मोदींनी शहराला निधी देण्यास सुरुवात केली, सर्व सुविधा शहरात असल्याने लोक शहरात येऊ लागले. मोदींनी शहरांसाठी अनेक योजना आणल्या असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  कोल्हापूर शहरात भेडसावणारे मुद्दे या पाच वर्षात आपण सोडवू शकतो. पर्यावरण, जल शुद्धीकरण आणि हवा प्रदूषण हे प्रश्न सोडवावे लागणार आहेत.  पूर्वीपासून हे सर्व क्षमता असलेले शहर आहे. 700 कोटी रुपयांचा टोल मी मुख्यमंत्री असताना घालवला. हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक निर्णय होता. कोल्हापूर शहराला वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.  कोल्हापूरमध्ये आता हळूहळू विकासाचा बदल पहायला मिळतोय.  वेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूक आता कोल्हापूरमध्ये यायला सुरुवात झाली आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रॅपीड फायर प्रश्नाला उत्तर देताना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं आहे. मी जर राजकारणात नसतो तर चांगला वकील झालो असतो, एकनाथ शिंदे जर राजकारणात नसते तर ते चांगले सामाजिक संस्था किंवा युनियन लीडर झाले असते. अजित पवार जर राजकारणात नसते तर ते उत्तम शेतकरी झाले असते, किंवा पोलीस अधिकारी झाले असते कारण ते सर्वांना धाकात ठेवतात, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.