AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा बेकायदा रॅपिडो बाईक चालकाला परिवहन मंत्र्यानेच पकडले, परवानगी नसताना सुरु आहे सेवा

राज्य शासनाने कोणत्याही बाईक ॲपला अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरित्या अँपद्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला आता खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहात पकडले आहे.

जेव्हा बेकायदा रॅपिडो बाईक चालकाला परिवहन मंत्र्यानेच पकडले, परवानगी नसताना सुरु आहे सेवा
| Updated on: Jul 02, 2025 | 9:18 PM
Share

महाराष्ट्र सरकारने कोणतीही परवानगी दिली नसताना देखील राज्यात रॅपिडो बाईक सेवा बिनदिक्कत सुरु आहे. या संदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर खुद्द राज्याच्या परिवहन मंत्र्याने या रॅपिडो बाईक सेवेवर कॉल करुन ती बुक केली. त्यानंतर या रॅपिडो बाईक चालक हजर होताच परिवहन मंत्र्यांनी त्याची चांगलीच हजेरी घेतली. राज्यातील परिवहन विभागाने कोणतीही परवानगी दिली नसताना ही सेवा सुरु असल्याचे खुद्द परिवहन मंत्र्यानेच दाखवून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र शासनाने नुकतेच इ-बाईक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत. परंतू असे असताना राज्यात रॅपिडो बाईक  टॅक्सी सेवा बिनदिक्कत सुरु असल्याचे उघड झाले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारले असता, ‘मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही. असे ” सरकारी ” उत्तर मिळाले होते.  तरीही , त्याची उलट तपासणी करण्याचे हेतूने मंत्री  प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी ॲपवर स्वतः वेगळ्या नावाने बाईक बुक केली. पुढच्या दहा मिनिटांमध्ये ही बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये हजर झाली. अशाप्रकारे अनधिकृतरित्या ” बाईक ॲप ” चालवणाऱ्या संस्थेचा भांडा -फोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केला आहे. आता, खुद्द मंत्री महोदयांना खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याचे औस्त्युक्य लागून राहिले आहे.

मंत्री म्हणाले की….

या रॅपिडो बाईकचा क्रमांक  MH 01 EU 8501 हा होता. त्या बाईकच्या चालकाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडे म्हणून ५०० रुपये देऊ केले . आणि म्हणाले की  ‘तुझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणावर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. परंतू, या मागे लपलेल्या मोठ्या माशांना शासन झालेच पाहिजे! हाच आमचा हेतू आहे.” असेही ते म्हणाले!

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.