नाशिकमध्ये जाऊन संजय राऊत म्हणाले, तुकाराम मुंढे आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या!

सचिन पाटील

|

Updated on: Feb 13, 2021 | 2:01 PM

संजय राऊत म्हणाले, IAS तुकाराम मुंढे जेव्हा आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा त्या फाईली वर आल्या.

नाशिकमध्ये जाऊन संजय राऊत म्हणाले, तुकाराम मुंढे आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या!
Tukaram Mundhe_Sanjay Raut

Follow us on

नाशिक : “तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले तेव्हा फाईली वर आल्या, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकच्या राणे नगर परिसरात विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. (When Tukaram Mundhe came, the files went in the box said Shiv Sena MP Sanjay Raut in Nashi)

संजय राऊत म्हणाले, “IAS तुकाराम मुंढे जेव्हा आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा त्या फाईली वर आल्या. यापुढे फाईली ढगात जाणार नाहीत. महाराष्ट्रात वातावरण बदलतंय. नाशिकचं वातावरण बदललं की महाराष्ट्रातलं वातावरण बदलतं. अनेक जुने सहकारी पुन्हा पक्षात आले. देशासाठी बलिदान देण्याची नाशिकला मोठी परंपरा आहे. निवडणुका येतात जातात. निवडणुका येतात म्हणून आपण काम करतो असं नाही. आपल्या रक्तात सामाजिक कार्य आहे. शिवसेनेची ती परंपरा आहे. त्यामुळेच लोक आपल्यामागे उभे राहतात”.

मागचा काळ विसरुन गेला पाहिजे. आता नवीन पहाट होत आहे. आपण त्या दिशेने पुढे जाऊया, असं संजय राऊत म्हणाले.

VIDEO : संजय राऊत यांचं भाषण

संजय राऊत यांचा नाशिक दौरा

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे सातत्याने नाशिक दौरा करत आहेत. नुकतंच त्यांनी डिसेंबर महिन्यातही नाशिकमध्ये राजकीय कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते, “सध्याचं राजकीय वातावरण बदललं आहे. त्यामुळे आम्हीही नाशिकपासून कामाला सुरुवात केली आहे, असं सांगतानाच कुणी कितीही वल्गाना केल्या तरी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल. मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल”, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.
नाशिकमध्ये वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने, सेनेची ताकद वाढली आहे.

(When Tukaram Mundhe came, the files went in the box said Shiv Sena MP Sanjay Raut in Nashi)

संबंधित बातम्या 

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा

बागुल, गीतेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेची भगवी शाल उबदार, तेजस्वी होणार? संजय राऊत म्हणाले…

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI