AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना नेमकं कुठे ठेवलंय? पहिल्यांदाच लोकेशन समोर, दिल्लीवरून थेट.., मोठी खळबळ

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या खासदारांना आता सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीतून इतरत्र हलवण्यात आलं आहे. त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देखील पुरवण्यात आली आहे.

Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना नेमकं कुठे ठेवलंय? पहिल्यांदाच लोकेशन समोर, दिल्लीवरून थेट.., मोठी खळबळ
संजय राऊतांचा मोठा दावा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 18, 2026 | 3:25 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या 6 खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच त्यांना सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीतून इतरत्र हलवण्यात आलं आहे. हे खासदार दिल्लीमधून नेमके कुठे गेले? याबाबत सर्वांच्याच मनामध्ये मोठी उत्सुकता आहे. या संदर्भात आता मोठी बातमी समोर येत आहे, ते म्हणजे या खासदारांचं लोकेशन आता समोर आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी या खासदारांच्या लोकेशन संदर्भात माहिती दिली आहे. तसेच या खासदारांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

त्या खासदारांना 25 कोटी मिळाले. काल रात्री 10-10 कोटी दिले. त्यांना राजस्थानमधील एका जागेत सुरक्षित हलवले आहे, असा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान यावेळी बोलताना राऊत यांनी भाजप नेते आणि गिरीश महाजन यांच्या विधानाचा देखील जोरदार समाचार घेतला आहे. राडे करणार की नाही हे कोण ठरवणार. गिरीश महाजन पोलिसांच्या गाड्या बाजूला ठेवून या, आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही, मग त्यांना वाय प्लस, सीआरपीएफची सेक्युरिटी, घरावर, मालमत्तेवर सुरक्षा का दिली? प्रत्येक गद्दारांना सेक्युरिटी देण्याचं कारण काय? तुम्ही सेक्युरिटी काढा तुमच्या अंगावर चिंधी राहणार नाही. तुमचे बॉस शिंदे हे सुरक्षा घेऊन फिरत आहेत. त्यांच्या चिरंजीवांकडे देखील सुरक्षा आहे, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान तुम्ही खाकी वर्दी, ईडी, सीबीआयची मस्ती दाखवत आहात. गिरीश महाजन म्हणाले खासदार कसे फुटले? माझ्याकडे एक दिवस सीबीआय, ईडी आली तर सर्वात आधी गिरीश महाजन यांना फोडून नाही दाखवलं तर बघा. अर्धा तास ईडी सीबीआय माझ्याकडे द्या. गिरीश महाजनला फोडतो. हा माणूस काय शिकवतो. कुंभमेळ्याचे कंत्राट कुणाला दिले. माझ्याकडे यादी आहे. तुम्हाला भीती नाही ना, मग तुमचे नगरसेवक ठाण्यात का लपवता. राडेबाजीवर आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं असेल तर पोलीस बाजूला ठेवून या. अर्धा तास ईडी सीबीआय आम्हाला द्या. गिरीश महाजन पहिले फुटतील, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...