AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद तावडेंवर आरोप करुन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे ठाकूर पिता-पुत्र कोण?

विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडी प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी घेरले. त्यानंतर तिथे मोठा राडा झाला. हा संपूर्ण प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर घडला. ठाकूर पितापुत्रांच्या आरोपांमुळे तावडे 4 तास हॉटेलमध्ये अडकले होते.

विनोद तावडेंवर आरोप करुन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे ठाकूर पिता-पुत्र कोण?
विनोद तावडेंनी कोट्यवधी पैशांचं वाटप केल्याचा आरोप करणारे ठाकूर पिता-पुत्र कोण?
| Updated on: Nov 19, 2024 | 7:00 PM
Share

भाजप नेते विनोद तावडे आज विरारच्या विवांत हॉटेलमध्ये नालासोपाऱ्याचे भाजप उमेदवार राजन नाईक यांच्या भेटीसाठी गेले. पण त्यानंतर वेगळ्याच घडामोडी बघायला मिळाल्या. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर तिथे पोहोचले. त्यांच्यासोबत बहिआचे कार्यकर्तेदेखील होते. त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. तसेच विनोद तावडे यांनी पैसे वाटपासाठी 5 कोटी रुपये आणल्याचा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर हा सगळा प्रकार घडताना बघायला मिळाला. विवांत हॉटेलमध्ये तीन तास मोठा गोंधळ बघायला मिळाला. या राड्यामुळे विनोद तावडे यांना विवांत हॉटेलमध्ये स्थानबद्ध व्हावं लागलं. विनोद तावडे यांच्यावर पैशांच्या वाटपाचा गंभीर आरोप करणारे ठाकूर पिता-पुत्र नेमके कोण आहेत? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

हितेंद्र ठाकूर कोण आहेत?

विनोद तावडेंवर आरोप करणारे हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांची पालघर जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आहे. ते 1990 मध्ये पालघर जिल्ह्यातील वसई-विरारचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. याच पक्षाचं नाव पुढे बहुजन विकास आघाडी करण्यात आलं. या पक्षाच्या स्थापनेनंतर हितेंद्र ठाकूर 3 वेळा जिंकून आले. हितेंद्र ठाकूर एकूण 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. वसई विरार महापालिका, वसई तालुका पंचायत समिती, तसेच पालघर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाची ताकद आहे.

क्षितीज ठाकूर कोण आहेत?

क्षितीज ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत. ते नालासोपारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विशेष म्हणजे 2009 पासून सलग 3 विधानसभा निवडणुकीत क्षितीज ठाकूर जिंकून आले आहेत. त्यांचं देखील नालासोपाऱ्यात चांगलं प्रभुत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात बविआ पक्षाने नुकतीच विधानसभा निवडणूकही लढली. क्षितीज ठाकूर हे आज विनोद तावडे यांच्यावर आरोप करताना आक्रमक झालेले बघायला मिळाले.

ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.