गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील कोण?

गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील कोण?

मुंबई: मराठा आरक्षणाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षण याचिकेच्या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्तेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. गुणरत्न सदावर्ते हे  माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर तरुण जालना जिल्ह्यातील घनसावंगीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. वैजिनाथ पाटील असं या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा घनसावंगीतील मुरमा गावचा रहिवासी आहे.

32 वर्षीय वैजिनाथ हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील मजुरी करतात. वैजिनाथ सुशिक्षीत बेरोजगार असल्यानं मराठा आंदोलनात सक्रीय असतो. मुंबईतल्या आझाद मैदानात झालेल्या मराठा आंदोलनातही तो सहभागी  होता.

गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला

वैजिनाथ पाटीलने गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणावरील सुनावणीनंतर कोर्टाबाहेर आले. सदावर्ते माध्यमांशी बोलत असताना वैजिनाथने त्यांच्यावर हल्ला केला. मराठा आरक्षणाला तुमचा विरोध का असा सवाल करत वैजिनाथने हल्ला चढवला.

वैजिनाथला विकलांची मारहाण

मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंना हल्ला झाल्यानंतर मराठा समाजाच्या वैजिनाथ पाटील या तरुणाला वकिलांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी आता कायदा हातात घेणाऱ्या वकिलांवर गुन्हा दाखल होणार का, असा सवाल मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी उपस्थित केला.

हायकोर्टाबाहेर वैजिनाथ पाटील या तरुणाने गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला केला. एक मराठा, लाख मराठाची घोषणा दिली आणि गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.

गुणरत्न सदावर्तेंवरील हल्ल्याची चौकशी करणार

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील हल्ल्याची राज्य सरकार चौकशी करणार आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांने हे केलंय की मराठा समाजाची बदनामी करण्यासाठी हा प्रकार घडला आहे, याची चौकशी करु, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात दिली.

सदावर्ते यांची मराठा आरक्षणाविरोधात याचिका

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही. पण मराठा आरक्षणानंतर राज्याचे एकूण आरक्षण हे 68 टक्क्यांवर गेले आहे. याच संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे.

29 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले. या विधेयकाला सर्व विरोधकांनीही पूर्ण पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभा आणि विधान परिषद अशा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं. त्यानंतर राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर झालं. 1 डिसेंबरपासून हे आरक्षण मराठ्यांना लागू झालं.

संबंधित बातम्या  

मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला

हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मारहाण, वकिलांवर गुन्हा दाखल होणार का?   

मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला 

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही : हायकोर्ट   

मराठा आरक्षण : सरकारची बाजू हरिश साळवे मांडणार

Published On - 4:08 pm, Mon, 10 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI