मोठी बातमी! अजितदादांचा महापालिका निवडणुकीत पराभव का झाला? जरांगे पाटलांच्या दाव्यानं खळबळ, थेट म्हणाले मराठा समाज..
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना मोठा फटका बसला आहे, त्यानंतर आता महापालिका निवडणूक निकालावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं. मात्र दुसरीकडे या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे. ‘यांनी बघायला काही ठेवलंच नाही, हे लई कलाकार आहेत. पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेंचा आणि अजितदादांचा काटा काढला. अजितदादा पण असे लोक सांभाळतात त्यामुळे लोक लांब चालले आहेत. त्यांना आता कळालं पापी लोकं रक्ताने माखलेले लोक सोबत ठेवले तर असे परिणाम भोगावे लागतील. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे. आपण असे नासके लोक सोबत ठेवले म्हणून आपल्यावर इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा त्यांना पडलं नाही, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठ्यांचं मतदान अजित पवार यांना झालंच नाही. नाहीतर पुण्यात अजितदादांना इतकं कमी यश मिळालं नसतं. अजित पवरांना भाजप का जवळ करत नाही? यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं.दोन नासके सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला. यामुळेच महापालिका निवडणुकीत पराभव झाला, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Municipal Election 2026
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
मुसलमान दलित मराठा एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणूनच मी दलित मुस्लिम मराठ्यांना सांगत असतो की यांना एकदा पायाखाली चेंगरा, 2029 च्या निवडणुकीत होईल असं दिसत आहे. मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, अमलबजावणी झाली, मात्र प्रमाणपत्र वाटप सुरू नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती दिवस वेड्यात काढतात ते बघू? त्यांना मराठ्याचे मत पडत आहेत. नुसता जीआर काढून मराठ्यांची फसवणूक केली तर मराठा समाज तुम्हाला पाडू शकतो. महापालिकेत मिळालेल्या यशामुळे हवेत जाऊ नका, असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिला आहे.
