AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळ फडणवीसांना का भेटले? भाजपच्या बड्या नेत्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर

छगन भुजबळ यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीवर भाजप नेत्याकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

भुजबळ फडणवीसांना का भेटले? भाजपच्या बड्या नेत्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर
| Updated on: Dec 23, 2024 | 3:00 PM
Share

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यानं जुन्या अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे. त्यानंतर भुजबळ चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी अनेकदा आपली नाराजी देखील उघडपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

या भेटीवर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी म्हटलं की फडणीस यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक विषयावर चर्चा झाली. महायुतीला जे यश मिळालं आहे, त्यामध्ये ओबीसीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान या भेटीमध्ये फडणवीस यांनी भुजबळ यांना वेट वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं समजतंय. 10 दिवसांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

या भेटीवर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  छगन भुजबळ राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत, मंत्री म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिले, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी या ठिकाणी काम केलं आहे. एक ओबीसी समाजासाठी काम करणारा नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे.

मंत्रिमंडळात त्यांचा समावेश न झाल्याने स्वभाविक त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते नाराज होते. मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून त्यांनी ही भेट घेतली असू शकते. देवेंद्रजींचा जर एकंदर स्वभाव आपण पाहिला तर सगळ्यांशी समन्वय साधत सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती आहे. हीच त्यांच्या कामाची पद्धत आहे. भुजबळ साहेबांसारखा नेता नाराज असणं हे त्या  ठिकाणी योग्य वाटत नाही. देवेंद्र फडणीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ही भेट झाली असावी असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ