पोलीस दलात आकाचे प्रेमी, लवकरच मुख्यमंत्र्यांना ‘ती’ यादी देणार, सुरेश धस कडाडले
तृप्ती देसाई यांनी सांगितलेला 26 हा फार कमी आकडा आहे. सर्व कर्मचारी पोलीस अधिकारी यांची जर बेरीज केली तर ती २०० इतकी होईल. मी लवकरच यादी काढणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असे सुरेश धस म्हणाले.

बीडमधील 26 पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा, अशीही मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. आता यावर भाजप नेते सुरेश धस यांनी एक मोठा दावा केला आहे. “तृप्ती देसाई यांनी सांगितलेला 26 हा फार कमी आकडा आहे. सर्व कर्मचारी पोलीस अधिकारी यांची जर बेरीज केली तर ती २०० इतकी होईल. मी लवकरच यादी काढणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे”, असे सुरेश धस म्हणाले.
‘टीव्ही 9 मराठी’ने नुकतंच सुरेश धस यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी तृप्ती देसाईंनी केलेला दावा खरा असल्याचे सांगत, त्यांनी चुकीचा आकडा सांगितल्याचे म्हटलं आहे.
“त्या पोलिसांची बदली बीडच्या बाहेर नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर करा”
“फक्त २६ नाही तर १५० ते २०० अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतील असतील. तृप्ती देसाई यांनी २६ हा आकडा फार कमी सांगितला. हे सर्व कर्मचारी पोलीस अधिकारी यांची जर बेरीज केली तर ती २०० इतकी होईल. त्यांनी हा कमी आकडा सांगितला आहे. मी पण लवकरच यादी काढणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना ती देणार आहे. या सर्वांची बदली बीडच्या बाहेर नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर करावी, असं मी त्यांना सांगणार आहे”, असे सुरेश धस म्हणाले.
“महादेव मुंडेचे आरोपी 15 दिवसात जेलमध्ये गेले पाहिजेत”
“आकाचे पोलीस दलातील जे प्रेमी आहेत. आतापर्यंत एसपींना पोलीस दलातच कसं ठेवलं. मी कितीतरी वेळा याबद्दल बोललोय. महादेव मुंडेचे आरोपी आकाच्या मुलाच्या अवतीभवती फिरत होते. ते लगेच गायब झाले. त्या DYSP यांनी देखील अजून चार्ज घेतलेला नाही. DYSP देखील आकाचेच आहेत. महादेव मुंडेचे आरोपी सापडले पाहिजेत. ते १५ दिवसाच्या आत जेलमध्ये गेले पाहिजे. त्याची हत्या होऊन १५ महिने झाले. अतिशय निर्घृण हत्या झाली. कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये मारण्यात आले. त्यानंतर तहसीलदाराच्या दारात नेऊन टाकण्यात आलं. एसपींनी ज्या पद्धतीने यंत्रणा हलवायला हवी, तशी यंत्रणा हलवली जात नाही”, असेही सुरेश धस यांनी म्हटले
संतोष देशमुखांचे डोळे जाळलेले नव्हते
“डॉ. अशोक थोरात हा चांगला माणूस आहे. अंजली दमानिया यांनी चुकीची माहिती दिली. डॉक्टरांचीही चौकशी करावी लागेल. संतोष देशमुखांचा PM रिपोर्ट हा अतिशय क्लिअर आहे. संतोष देशमुखांचे डोळे जाळलेले नव्हते हे आम्हीही मान्य करतो. पण त्यांना मारहाण केलेली होती. मला ही सर्व माहिती मिळाली. त्यानंतर मग माझा संताप झाला. मी हा विषय सभागृहात मांडला आणि मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे, उद्याही असेन”, असे सुरेश धस म्हणाले.
