मोठी बातमी! उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार? बैठकीनंतर चर्चेला उधाण, एकनाथ शिंदेंनी सांगितली आतली गोष्ट

आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, त्यांनी ऑनलाईन हेजरी लावली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार? बैठकीनंतर चर्चेला उधाण, एकनाथ शिंदेंनी सांगितली आतली गोष्ट
उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 08, 2026 | 4:26 PM

आज दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष भविष्यात कसा वाढवायाच यावर चर्चा झाल्याची माहिती या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आज दिल्लीमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका होत्या, या दोन्ही बैठकांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. एक म्हणजे आज दिल्लीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारिणीची बैठक होती, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तर  दुसरीकडे आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची देखील बैठक पार पडली आहे. मात्र एवढी महत्त्वाची बैठक असूनही उद्धव ठाकरे या बैठकीला प्रत्यक्ष हजर नव्हते, त्यांनी ऑनलाई बैठक अटेंन्ड केली, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.  उद्धव ठाकरे या बैठकीला प्रत्यक्ष का उपस्थित नव्हते? यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

उद्धव ठाकरे दिल्लीच्या आजच्या बैठकीला प्रत्यक्ष हजर नव्हते, त्यांनी ऑनलाईन बैठक अटेन्ड केली. चर्चा अशी होती की मागच्यावेळी ममता बॅनर्जी नाराज झाल्या हेत्या, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली होती. मग जे उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी यांची समजूत काढतात, पुढाकार घेतात, मग ते उद्धव ठाकरे आजच्या बैठकीसाठी दिल्लीत का आले नाहीत, ते बैठकीला ऑनलाई हजर असल्यामुळे  वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार का? अशी देखील चर्चा सुरू आहे. मधल्या काळात  उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच मिलिंद नार्वेकर यांनी एसएमएस केले होते, असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारला, या प्रश्नला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मोठी विधान केलं आहे.

‘आता मी आपल्याला एकच सांगतो. हा जो निरुत्साह दिसून येत आहे, तो म्हणजे हे गलीतगात्र झालेले लोक आहेत.  मघाशी मी सांगितलं,  इंडिया आघाडीमध्ये आल्यानंतर पराभव होतो, अशा प्रकारचा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे आणि म्हणून या बैठकीपासून काही लोक दूर झाले आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

 

Follow Us