AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शीना बोरा अन् पेणमधील घटनेनंतर पुन्हा महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह, गुलाबी रंगाच्या बॅगेत…

Mumbai Crime: धावत्या ट्रेनमधून मृतदेह फेकण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या स्टेशनवर कोणकोणत्या गाड्या थांबता त्याचा तपास पोलीस करत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. त्यातून ही बॅग कोण घेऊन आले त्याचा शोध घेतला जाणार आहे.

शीना बोरा अन् पेणमधील घटनेनंतर पुन्हा महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह, गुलाबी रंगाच्या बॅगेत...
crime news
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 17, 2025 | 9:01 AM
Share

Mumbai Crime: राज्यात पुन्हा मुंबईतील शीना बोरा हत्येची आठवण झाली आहे. शीना बोरा हत्या, पेणमध्ये सुटकेसमध्ये सापडलेला मृतदेह या घटना अजूनही विस्मृतीत गेल्या नाही. त्याचवेळी रायगड जिल्ह्यात पुन्हा एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला आहे. कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर महिलेचा मृतदेह गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये सापडला आहे. शीना बोरा आणि पेणपाठोपाठ रायगड जिल्ह्यात तिसरी ही थरारक घटना समोर आली आहे.

पनवेल पुणे रेल्वे मार्गावर कर्जत रेल्वे ट्रकवर एका गुलाबी सुटकेसमधून महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबण्यात आला आहे. धावत्या ट्रेनमधून ही बॅग फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे हत्येचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ही महिला कोण आहे? तिची हत्या कोणी अन् कशासाठी केली? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतर समोर येणार आहे.

धावत्या ट्रेनमधून मृतदेह फेकण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या स्टेशनवर कोणकोणत्या गाड्या थांबता त्याचा तपास पोलीस करत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. त्यातून ही बॅग कोण घेऊन आले त्याचा शोध घेतला जाणार आहे.

कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या या मृतदेहामुळे ‘सुटकेस बॉडीज’ ही भयानक संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या आधी शीना बोरा हत्या प्रकरण, पेणमध्ये सुटकेसमधून सापडलेला मृतदेह हे प्रकार घडले होते. आता कर्जतमधील ही घटना आहे. या सलग तीन प्रकरणांनी रायगड जिल्ह्यात नेमके काय सुरू आहे, असा गंभीर सवाल निर्माण होत.

सन २०१२ मधील शीना बोरा हत्या प्रकरण देशभर गाजले होते. शीना बोराची हत्या इंद्राणी मुखर्जी, तिचा चालक श्यामवर आणि संजीव खन्ना यांनी गळा दाबून केली होती. त्यानंतर शीना बोराचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरुन रायगडच्या जंगलांमध्ये फेकला होता. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील दुरशेत फाटा येथे नदी किनारी एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यावर्षी मार्च महिन्यातच ही घटना घडली होती. दरम्यान, आता लोणावळा रेल्वे पोलिस यंत्रणा महिलेची ओळख पटविण्याचे काम करत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?