AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने घरी मेसेज केले अन् धरणात घेतली उडी

करण दीक्षित याचा मृतदेह धरणातून काढल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याने धरणात उडी मारुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. करण दीक्षित हा पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने घरी मेसेज केले अन् धरणात घेतली उडी
अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणाने धरणात उडी मारली
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 17, 2025 | 7:48 AM
Share

Pune Crime: पुण्यातील राजगड तालुक्यातील कानंद गावाच्या हद्दीत गुंजवणी धरणात उडी मारुन पुण्यातील महाविद्यालयीन तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली. हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. करण शंकर दीक्षित ( वय २४, रा. धनकवडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने नातेवाईकांना मोबाईलवर मेसेज पाठवला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचा शोध सुरु केला. चार तासांच्या शोधमोहिमेनंतर वेल्हे पोलिसांनी हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या रेक्सु पथकाच्या मदतीने करण याचा मृतदेह धरणातील खोल पाण्यातून बाहेर काढला.

करण दीक्षित याचा मृतदेह धरणातून काढल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याने धरणात उडी मारुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. करण दीक्षित हा पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. मंगळवारी 15 एप्रिलला तो घरातून दुचाकी गाडीवरून निघून आला. त्याने घरातील नातेवाईकांना मी आत्महत्या करत आहे, असा मेसेज मोबाईलवर पाठवला होता. त्यामुळे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. या बाबत नातेवाईकांनी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात करण हा बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वेल्हे पोलिसांना एका तरुणाने गुंजवणी धरणात उडी मारली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रसाद मांडके आणि हवालदार युवराज सुर्यवंशी यांनी हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे रेक्सु पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रेक्सू पथकाचे प्रमुख तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, संदीप सोलस्कर, निलेश जाधव तसेच कानंदचे पोलीस पाटील संजय कडू यांनी धरणात उतरून शोध कार्य सुरू केले. चार तासानंतर दुपारी चार वाजण्याच्या खोल पाण्यातून करण याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

खोल पाणी असल्याने मृतदेह शोधण्यासाठी रेक्सू पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह वेल्हे येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. धरणाच्या काठावर मयत करण दीक्षित याचे कपडे, मोबाईल फोन, दुचाकी गाडीची चावी, चप्पल त्याचा मृतदेह आढळला. करण याने शेवटचा फोन सकाळी ७ वाजून पन्नास मिनिटांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे त्याने या नंतर कपडे, मोबाईल काढून धरणात उडी मारली असावी, असा अंदाज आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?