AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघर हादरलं! बंद सुटकेसमध्ये आढळलं महिलेचं मुंडकं

विरारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विरार फाट्याच्या पिरकुंडा दर्गा परिसरात ओसाड ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचं मुंडक आढळून आलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

पालघर हादरलं! बंद सुटकेसमध्ये आढळलं महिलेचं मुंडकं
crime scene
| Updated on: Mar 13, 2025 | 9:24 PM
Share

पालघरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  विरार फाट्याच्या पिरकुंडा दर्गाजवळ  एका ओसाड ठिकाणी महिलेचे सुटकेस मध्ये मुंडके आढळले आहे. तेथील स्थानिक मुलांनी ही सुटकेस उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान  घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. होळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ते सुटकेसमध्ये घालून आरोपींनी त्याची विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या कलिना येथून फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली असून, अधिक तपास सुरू आहे. मांडवी पोलीस या हत्येचा तपास करत असून, हा गुन्हा कोणी आणि कोणत्या कारणाने केला याचा शोध घेत आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विरारमध्ये ही हादरवणारी घटना घडली आहे. विरार फाट्याच्या पिरकुंडा दर्गाजवळ स्थानिक मुलांना ही सुटकेस सापडली, त्यांनी उत्सुकतेपोटी ती उघडली असता त्यामध्ये महिलेचं धडावेगळं केलेलं मुंडकं आढळून आलं आहे. या घटनेमुळे त्यांनाही मोठा धक्का बसला.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजूनही तिची पूर्ण ओळख समोर आलेली नाहीये. या महिलेची अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे. तीचं मुंडकं पोलिसांना मिळालं आहे, आता इतर अवयव आरोपींनी कुठे टाकले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.  ही हत्या नेमकी का आणि कशासाठी करण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे.

Follow Us
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?