महाराष्ट्रात चाललय काय; न्याय हक्कासाठी गरोदर वनरक्षक महिलेने पुकारलय आंदोलन…

वन विभागातील महिला कर्मचाऱ्याने वन विभागाच्या जागेत उत्खनन करण्यात आल्याने ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली तर त्याच महिला वन कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

महाराष्ट्रात चाललय काय; न्याय हक्कासाठी गरोदर वनरक्षक महिलेने पुकारलय आंदोलन...
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 3:58 PM

सांगलीः न्याय हक्कासाठी आठ महिन्याच्या गरोदर महिला वन कर्मचाऱ्याचे वन विभागा विरोधातच धरणे आंदोलन पुकारले आहे. ज्या महिला वन विभाग कर्मचारी रेना पाटोळे यांनी आपल्यावर अन्याय झाला म्हणून उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्या तक्रारीचीही चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती सांगलीच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी दिली आहे. सांगलीच्या वन विभागातील एका आठ महिन्याच्या गरोदर महिला वनरक्षक कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

कुपवाड इथल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर पीडित गर्भवती कर्मचारी महिलेने बेमुदत आंदोलनाला बसल्या आहेत.

वन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई केल्याच्या रागातून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिल्याचा निषेधार्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील रेड या ठिकाणी रायना पाटोळे या वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या हद्दीत शेखरवाडी ते इंगरूळकडे जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या क्षेत्रांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने खुदाई करण्यात आली आहे.

आणि जवळपास साडे चारशे ब्रास उत्खननही करण्यात आले होते. या प्रकाराबाबत वन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक होते. त्यामुळे वनरक्षक महिला कर्मचारी रायना पाटोळे यांनी यावर आक्षेप नोंदवला होता.

त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात पाटोळे यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. पण गुन्हा मागे घेण्यासाठी वनविभागातील वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्रपाल सचिन जाधव आणि सुरेश चरापले यांनी दबाव आणला.

त्याचबरोबर त्यांनी आपली बदनामी करण्यासाठी आणि आपल्या विरोधात ग्रामपंचायत आणि कर्मचाऱ्यांची निवेदनाही वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आले होते.

ज्यामुळे आपल्याला एक महिन्यापासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. केवळ शासकीय काम योग्य पद्धतीने बजावल्यामुळे आपल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत, रायना पाटोळे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सांगलीच्या कुपवाड येथील वन कार्यालयासमोर पाटोळे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे पाटोळे या सध्या आठ महिन्याच्या गरोदर आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत, न्याय हक्कासाठी लढा सुरू करण्यात आला आहे.

ज्या महिला वन विभाग कर्मचारी रेना पाटोळे आपल्यावर अन्याय झाला म्हणून उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्या तक्रारीचीदेखील चौकशी सध्या सुरू असल्याचे सांगलीच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी माहिती दिली आहे.

तसेच सचिन जाधव यांच्यावर जी निलंबनाची कारवाई सध्या करण्यात आली त्यांच्याशी रेना पाटोळे यांच्या तक्रारीचा काही संबंध नसल्याचा खुलासादेखील उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.