तुळजापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम 2 वर्षांपासून रखडलं, नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात गेल्या 2 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रलंबित आहे.

तुळजापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम 2 वर्षांपासून रखडलं, नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा 
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 2:33 AM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात गेल्या 2 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रलंबित आहे. त्यामुळे शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाला सरकारने प्रशासकीय मान्यता न दिल्याने हे पुतळ्याचे काम रखडल्याचा आरोप होतोय. तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिलाय. शिवजयंतीच्या तोंडावर पुतळ्याचे हे प्रकरण पेटल्यानंतर तुळजापूर नगर परिषदेच्या कारभाऱ्यांनी आता जाग आली आहे (Work of Shivaji Maharaj Statue in Tuljapur pending from 2 years.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिली. मात्र त्याच आई भवानीच्या तुळजापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम गेली 2 वर्षांपासून रखडल्याने महाराजांचा पुतळा तुळजापुरात होऊ शकला नाही, असा आरोप होतोय. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेने विशेष सभा घेतली. यात आराखड्यातील 20 लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली.

खर्च 20 लाखांवरून 78 लाखांवर

असं असलं तरी 2019 ते 2021 या 2 वर्षात पुतळ्याचे सुशोभीकरण विविध दुरुस्ती आणि आराखडा बदलल्याने खर्च 20 लाखांवरून 78 लाखांवर गेला. प्रशासकीय मंजुरीपेक्षा 30 टक्के पेक्षा अधिक आर्थिक खर्च वाढल्याने आता हे प्रकरण नगर विकास विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी केलंय. ते 20 जानेवारी 2021 पासून प्रलंबित आहे.

भाजपच्या ताब्यातील पालिकेत  शिवाजी महाराज यांचा पुतळा गेली 2 वर्ष प्रलंबित

सरकारने अतिरिक्त खर्चास मान्यता न दिल्याने पुतळा व चौक सुशोभीकरणाचे काम रखडले आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने या पुतळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. तुळजापूर नगर परिषद ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वातील भाजपच्या ताब्यात आहे. भाजप नेहमी शिवाजी महाराज यांच्यावर भक्ती असल्याचे दाखवते मात्र त्यांच्याच ताब्यातील पालिकेत  शिवाजी महाराज यांचा पुतळा गेली 2 वर्ष उभा राहू शकला नाही, असा आरोप होतोय.

नगर परिषदेकडे चौकांचे सुशोभीकरणाचा 2 कोटी रुपयांचा निधी शिल्लक

नगर परिषदेकडे विविध चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा औरंगाबाद येथे तयार आहे. मात्र प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठवूनही तो सरकारकडून मंजूर न केल्याने काम सुरु होऊ शकले नाही, अशी प्रतिक्रिया तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात 11 फेब्रुवारी रोजी नगरसेवक विनोद गंगणे, विशाल रोचकरी, विजय कंदले व इतर नगरसेवक उपोषण करणार आहेत. नगर परिषदेची या प्रकरणात कोणतीही चूक नाही केवळ मान्यता मिळत नसल्याने हे काम रखडल्याचंही त्यांनी सांगितले.

सत्ताधारी शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांचे नेते मोठ्या श्रद्धेने तुळजापुरात येतात आणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नावाने जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत मतांचा जोगवा मागतात. मात्र हा पुतळा उभा राहण्यासाठी प्रशासकीय लाल फितीच्या कारभारासोबतच राजकीय नेतृत्वाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येते.

संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचीही दुरावस्थाच 

तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी  भय्यूजी महाराज यांनी स्वतःची जमीन विकली आणि त्यातून आलेला पैसे निधी स्वरूपात पुतळा उभारण्यासाठी दिला. तुळजापूर येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानात संभाजी महाराजांचा सिंहाशी झुंज देत असतानाच पूर्णाकृती पुतळा 2013 मध्ये उभा केला.

त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वतः कार्यक्रमास हजर होते. मात्र, आता या बागेची व पुतळ्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. याकडे तुळजापूर नगर परिषद व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या हा बगीचा कुलूपबंद आहे, तर लाखो रुपये खर्च करून उभी केलेली खेळणी भंगार स्थितीत आहेत. संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा रंग अनेक ठिकाणी उडाला आहे, तरी देखील याकडे नगर परिषदेसह राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.

छत्रपतींचे वारस असलेल्या संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षण ठोक मोर्चा वेळी तुळजापूर येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ उभा करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही.

तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्र असलेल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची अशी दुरावस्था होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

हेही वाचा :

उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर, शिवाजी महाराजांवर राजकारण नको : जयंत पाटील

व्यंकय्या नायडू नियमाने वागले, पण नियम आणि भावना वेगळ्या, शिवराय आमचं दैवत : संजय राऊत

शिवराज्याभिषेक सोहळा यंदा साधेपणाने, खासदार संभाजीराजे शिवप्रेमींचं प्रतिनिधित्व करणार

व्हिडीओ पाहा :

Work of Shivaji Maharaj Statue in Tuljapur pending from 2 years

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.